Jalgaon News : राष्ट्रवादी शरद पवार गटातर्फे निवडणूक आयोग, अजित पवारांचा निषेध | पुढारी

Jalgaon News : राष्ट्रवादी शरद पवार गटातर्फे निवडणूक आयोग, अजित पवारांचा निषेध

जळगाव: पुढारी वृत्तसेवा- निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चिन्ह व नाव हे अजित पवार गटाला दिल्यामुळे  राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातर्फे निवडणूक आयोग व अजित पवार गटाचा राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयाच्या बाहेर निषेध करण्यात आला.

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातर्फे (दि. 7) रोजी निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाविरोधात घोषणाबाजी करत निषेध करण्यात आला. आले रे आले गद्दार आले, राष्ट्रवादी पक्ष आमच्या हक्काचा नाही कोणाचा बापाचा, केंद्र सरकारच्या हातातील बाहुल्या निवडणूक आयोगाचा निषेध असो, अजित पवारांचा निषेध असो, लोकशाही तुडावणाऱ्या केंद्र सरकार व राज्य सरकार चा निषेध असो अश्या विविध घोषणा देण्यात आल्या. जोरदार घोषणाबाजी करून निषेध व्यक्त कारण्यात आला.

जो पक्ष खासदार शरद पवार यांनी प्रचंड मेहनतीने उभा केला. त्या पक्षावर निवडणूक आयोगाला हाताशी धरून व सत्तेचा गैरवापर करून संख्येच्या बळावर दावा केला गेला.  त्यापेक्षा स्वतःचा पक्ष स्थापन करून जनतेतून निवडून येऊन दाखवा. शरद पवार होते म्हणून अजित पवारांना तीन वेळा उपमुख्यमंत्री पद, विरोधी पक्ष नेते, मंत्री असे उच्च पदे उपभोगयाला मिळाले आणि आता त्यांच्याच पक्षावर कब्जा केल्याची टीका करण्यात आली.

यावेळी ॲड भैय्यासाहेब रविन्द्र पाटील, अशोक लाडवंजारी, विकास पवार, वाय एस महाजन, रिंकू चौधरी, मंगला पाटील, वाल्मिक पाटील, इब्राहिम तडवी, उमेश पाटील, रमेश पाटील, मजहरभाई पठाण, अशोक सोनवणे, राजु मोरे, अमोल कोल्हे, वर्षा राजपूत, प्रतिभा शिरसाट, कला सिरसाट, सुहास चौधरी, अकबर खान, डॉ. रिजवान खाटीक, हितेश जावळे, गौरव वाणी, सचिन पाटील, चेतन पवार, रमेश बारे, खलिल शेख, आकाश हिवाळे, भाऊसाहेब इगळे, संजय जाधव, बशीर शाह, मतिन सैय्यद  इतर पदाधिकारी कार्यकर्त उपस्थित होते.

हेही वाचा :

Back to top button