Five Months Into Israel-Hamas War : युद्धाचा ५ वा महिना | हमासचा इस्रायलला शांतीचा प्रस्ताव; 3 टप्प्यात शस्त्रसंधी करण्याची तयारी | पुढारी

Five Months Into Israel-Hamas War : युद्धाचा ५ वा महिना | हमासचा इस्रायलला शांतीचा प्रस्ताव; 3 टप्प्यात शस्त्रसंधी करण्याची तयारी

पुढारी ऑनलाईन डेस्क : इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध सुरू होऊन बुधवारी ५ महिने पूर्ण होत आहेत. या संघर्षात गाझा पट्टीत न भूतो असे मानवी संकट निर्माण झालेले आहे. हा संघर्ष संपवण्यासाठी हमासने इस्रायला नव्याने प्रस्ताव दिला आहे. ३ टप्प्यात शस्त्रसंधी करावी, असे हमासने म्हटले आहे. (Five Months Into Israel-Hamas War)

कतार आणि इजिप्तमधील मध्यस्थांच्या मार्फत हा प्रस्ताव इस्रायलला सादर करण्यात आला आहे. सीएनएन या वेबसाईटनेही बातमी दिली आहे. हा प्रस्ताव खालीलप्रमाणे आहे. (Five Months Into Israel-Hamas War)

टप्पा १ – हमासने बंधक बनवलेल्या इस्रायली नागरिकांची सुटका केली जाईल, यात महिला आणि लहान मुलांचा समावेश असेल. या बदल्यात इस्रायलने ठराविक युद्ध कैद्यांची सुटका करावी. गाझात मानवतावादी कार्य सुरू होण्यासाठी जास्त लोकसंख्या असलेल्या भागातून इस्रायलने सैनिक हटवावेत, जेणे करून येथील हॉस्पिटल आणि घरांची दुरुस्ती, पुनर्बांधणी करणे शक्य होईल. बंधकांना मुक्त करण्यासाठी योग्य ती व्यवस्था उभी केली जावी. या काळात हवाई हल्ले आणि लष्करी कारवाई तात्पुरती थांबण्यात यावी. (Five Months Into Israel-Hamas War)

टप्पा २ – पूर्ण शांतात प्रस्थापित करण्यासाठी अप्रत्यक्ष चर्चा पूर्ण करावी. दोन्ही बाजूंनी लष्करी कारवाया थांबवण्यात याव्यात. गाझात बंधक बनवून ठेवलेल्या सर्व इस्रायली पुरुषांची सुटका केली जाईल, त्या बदल्यात इस्रायलने बंदी बनवलेल्या पॅलेस्टिनी नागरिकांची सुटका करावी.

टप्पा ३ – या संघर्षात जे मृत्युमुखी पडले आहेत, त्यांचे मृतदेहांची अदानप्रदान होईल. मानवतावादी काम आणि पुनर्बांधकाम सुरू राहील. शांतता प्रस्तावासाठी इजिप्त, कतर, तुर्की, रशिया आणि संयुक्त राष्ट्रे जामिन राहातील.

गाझात हाहाकार

हमासने ७ ऑक्टोबरला इस्रायलवर क्षेपणास्त्र हल्ला केला. यात १२००च्या वर इस्रायली नागरिकांचा मृत्यू झाला. हमासने मोठ्या संख्येने इस्रायलचे नागरिक बंधक बनवले आहेत. या प्रत्युत्तर म्हणून इस्रायलने गाझा पट्टीत लष्करी कारवाई सुरू केली, त्यात २७,५०० पॅलेस्टिनी नागरिक मारले गेले. गाझातील मृत, जखमी आणि बेपत्ता झालेल्या नागरिकांची संख्या १ लाखावर आहे.

हेही वाचा

Back to top button