धुळ्यात निवडणूक आयोगाच्या विरोधात शरद पवार गटाचे आंदोलन

धुळ्यात निवडणूक आयोगाच्या विरोधात शरद पवार गटाचे आंदोलन

धुळे: पुढारी वृत्तसेवा-निवडणूक आयोगाने अजित पवार गटाकडे पक्षाचे नाव व चिन्ह देण्याचा निर्णय घेतला. या विरोधामध्ये  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने(शरद पवार गट) गांधी पुतळा येथे निषेध आंदोलन केले. यावेळी कार्यकर्त्यांनी काळ्या फिती लाऊन निषेध व्यक्त केला.

यावेळी जिल्हाध्यक्ष रणजीत भोसले यांनी कठोर शब्दात भारतीय जनता पार्टीवर टीका केली. निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय अतिशय दुर्भाग्यपूर्ण आहे. आयोग ही भाजपाच्या हातातली कटपुतली बनलेले आहे. निकालामागे निवडणूक आयोग, मोदी, शहा यांचे षडयंत्र व मिलीभगत दिसून येते. असा आरोप यावेळी भोसले यांनी केला. महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेला माहिती आहे की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना कोणी केली? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक कोण आहे, हे एवढे सत्य असताना सुद्धा दडपशाहीमध्ये व हुकूमशाही मध्ये निवडणूक आयोगाने अतिशय चुकीचा निर्णय घेतलेला आहे. भाजपच्या युती शासनाच्या काळामध्ये लोकशाहीची हत्या करण्याचा हा प्रयत्न आहे. विरोधी पक्षांना संपवण्याचा डाव रचण्यात येत आहे. या सर्व गोष्टी संतापजनक आहे. यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संतापाची व नाराजीची लाट पसरली आहे. असे त्यांनी स्पष्ट केले.

निवडणूक आयोगाच्या निर्णया विरोधामध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाने गांधी पुतळ्यासमोर निषेध व्यक्त करून भाजप युतीच्या निषेधार्थ विरोधामध्ये घोषणा दिल्या. यावेळी कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच मंत्री अमित शहा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या फलकावरील फोटोला चपला मारून निषेध व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ह्या निर्णयाच्या विरोधामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये व जनतेच्या समोर न्याय मागणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांसाठी शरद पवार हाच पक्ष व शरद पवार हे चिन्ह आहे हे निवडणूक आयोगाने लक्षात घ्यावे असा इशारा देखील देण्यात आला.

या आंदोलनामध्ये पक्षाचे निरीक्षक उमेश पाटील, शहर जिल्हाध्यक्ष रणजीत भोसले, ग्रामीण जिल्हाध्यक्ष जितेंद्र मराठे, राजू डोमाळे, हाशिम कुरेशी, शकीला बक्ष, अशोक धुळकर ,वाल्मीक मराठे, शामराव मोरे, जीवन चव्हाण, दीपक जाधव, अंबर मालचे, जमीर शेख, गोरख शर्मा, सयाजीराव ठाकरे, गिरीश नेरकर, प्रदीप नांद्रे, किरण देवरे, विनोद बच्छाव, संदीप भामरे, राजेंद्र सोलंकी, जितू पाटील, जयश्री घेटे, चेतना मोरे, स्वामिनी पारखे, दिलीप पाटील, उषा पाटील, राजू पाटील, दीपक देवरे, निखिल वाघ, भोला सौंदाणे, आकाश बैसाणे, राजेंद्र चौधरी, सलमान खान, राजेंद्र चौधरी, प्रशांत बोरसे, हर्षल ठाकरे, रेखा अहिरे, कविता बोरसे, नूर शाह, भिका नेरकर, जावेद बेग, अमीन शेख, रामेश्वर साबरे, राजेश तिवारी, राजेंद्र सोनवणे, ईश्वर जाधव, धनराज पाटील, हेमंत पाटील, भाग्येश मोरे, डी टी पाटील,ड्रॉ शांताराम पाटील, अमित शेख,रुबाब पिंजारी, मंगलदास वाघ, जाकीर खान तथा पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news