Nashik | दहशत निर्माण करणारा सराईत गुन्हेगार तीन तासातच अटकेत | पुढारी

Nashik | दहशत निर्माण करणारा सराईत गुन्हेगार तीन तासातच अटकेत

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा
उत्तमनगर भागातील शुभमपार्क उदयान जवळ तीन गुन्हेगारांनी हातात कोयता घेत दुचाकीवर फिरून परिसरात दहशत निर्माण केली. यावेळी त्यांनी एका चारचाकी वाहनाच्या काचा फोडल्या. याप्रकरणी पोलिसांनी सापळा रचून तीन तासातच सराईत गुन्हेगार ताब्यात घेऊन त्यास अटक केली आहे.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, शुभमपार्क उदयानजवळ रविवारी, दि.4 रात्री ८ वाजेच्या दरम्यान संशयित सराईत गुन्हेगार प्रणव हिरे व दोन जण दारू पिऊन हातात कोयता घेऊन दुचाकीवर परिसरात फिरत होते. यावेळी त्यांनी उदयानाजवळ एका कारच्या काचा फोडून परिसरात दहशत निर्माण केली. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिलीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप नरीक्षक नाईद शेख सहपथक दाखल झाले. अंबड पोलिस ठाणे येथे तीन ही संशयितावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर पोलिसांनी संशयिताचा शोध सुरु केला. पोलिसांना गोपनिय मिळालेल्या माहितीनुसार आयटीआय पुला जवळ सापळा रचून मुख्य सराईत गुन्हेगार प्रणव हिरे याला ताब्यात घेऊन अटक केली आहे.

हेही वाचा:

Back to top button