सव्वादोनशे किलो वजनाच्या अस्वलाची चोरी!

सव्वादोनशे किलो वजनाच्या अस्वलाची चोरी!

ओटावा : पाळत ठेवून चोरी केली जाणे, मोठा ऐवज लंपास होणे यात फारसे नावीण्य राहिलेले नाही. सोने-चांदी, पैसा अडका चोरण्यासाठी चोर बेमालूम क्लुप्ती रचत असतात. शिताफीने चोरी करत असताना पोलिसांच्या जाळ्यात सापडायचे नाही, याचीही त्यांना काळजी घेणे भाग असते. मात्र, काही चोरीचे प्रकार असेही असतात, जे आश्चर्याचा धक्का दिल्याशिवाय रहात नाहीत. अशीच एक चोरीची घटना कॅनडात घडली असून तेथे एका रिसॉर्टमधून चक्क सव्वादोनशे किलो वजनाचे अस्वलच चोरट्यांनी लंपास केले आहे!

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चोरट्यांनी 225 किलो वजनाच्या विशाल ध्रुवीय अस्वलावर डल्ला मारला. आता पोलिस, चोर आणि अस्वल या दोघांचा शोध घेत आहेत. अंदाजे 12 फूट लांब असलेल्या या अस्वलाची सुटका करून ते स्टर्जन काऊंटीमध्ये असलेल्या लिली लेक रिसॉर्टमध्ये आणण्यात आले होते. मात्र 22 जानेवारी रोजी चोरट्यांनी ते चोरून नेले. तूर्तास, अस्वलाची विक्री करण्याचे आढळून आल्यास त्याची माहिती द्यावी, असे पोलिसांनी आवाहन केले आहे. कॅनडामध्ये ध्रुवीय अस्वलांची खरेदी-विक्री बेकायदेशीर आहे, असेही त्यांनी आपल्या आवाहनात म्हटले आहे. रिसॉर्ट स्टाफ वांडा रोवे यांनी या घटनेची माहिती देताना कडक थंडीमुळे काही काळ गस्त नसल्याचा फायदा चोरट्यांनी घेतला असल्याचा अंदाज व्यक्त केला. ते म्हणाले, 'येथे 24 तास सुरक्षा असते. रक्षकही गस्त घालतात; मात्र घटनेच्या रात्री कडाक्याच्या थंडीमुळे रक्षकांना गस्त घालता आली नाही.'

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news