ब्रह्मांडाचा सर्वात मोठा एक्स-रे

ब्रह्मांडाचा सर्वात मोठा एक्स-रे

नवी दिल्ली : बह्मांडातील आतापर्यंतचा सर्वात मोठा एक्स-रे आता समोर आला असून यात थोडेथोडके नव्हे तर चक्क 7 लाखांपेक्षा अधिक कृष्णविवरे आढळून आली आहेत. रशियन-जर्मन स्पेक्ट्रम आरजी स्पेस ऑब्झर्व्हटरीवर लावलेल्या एरोसिटा या एक्स-रे उपकरणाच्या आधारे शास्त्रज्ञांनी हा नकाशा तयार केला आहे. या नकाशात 9 लाखांहून अधिक हाय एनर्जी ब्रह्मांडीय स्रोत आढळून आले आहेत. त्यापैकी 7 लाखांहून अधिक तर सुपर मॅसिव्ह कृष्णविवरे आहेत. कंसोर्टियमने 31 जानेवारी रोजी हा डाटा एकत्रित केला.

या मोहिमेत सहकार्य करणार्‍या जर्मनीच्या प्लॅक सोसायटीने दिलेल्या माहितीनुसार, एरोसिटाकडून मिळालेल्या डाटामध्ये हे आतापर्यंतचे सर्वात मोठे कलेक्शन आहे. या पथकातील मुख्य शास्त्रज्ञ अँड्रिया मेरलॉनी यांनी असे नमूद केले की, मोहिमेच्या पहिल्या सहा महिन्यांच्या निरीक्षणातच एरोसिटाने इतकी एक्स-रे स्रोतांचा शोध लावला आहे की, इतकी माहिती खगोल इतिहासातील मागील सहा दशकांच्या कालावधीतही प्राप्त झाली नव्हती. 12 डिसेंबर 2019 ते 11 जून 2020 या कालावधीत एरोसिटाने नोंदवलेल्या निरीक्षणांचा यात प्रामुख्याने समावेश असल्याचे जर्मनीच्या मॅक्स प्लँक सोसायटीने यावेळी नमूद केले. त्यानंतर एरोसिटाला फेब्रुवारी 2022 मध्ये सेफ मोडवर नेण्यात आले आणि त्यानंतर त्याचे ऑपरेशन्स रिस्टार्ट केले गेले नाहीत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news