जळगाव : महा-ई-सेवा केंद्र व्हीएलई चालकाव्दारे ग्राहकाला खोटे प्रमाणपत्र दिल्याने गुन्हा दाखल | पुढारी

जळगाव : महा-ई-सेवा केंद्र व्हीएलई चालकाव्दारे ग्राहकाला खोटे प्रमाणपत्र दिल्याने गुन्हा दाखल

जळगाव : पुढारी वृत्तसेवा

पारोळा तालुक्यातील तामसवाडी येथे महा-ई-सेवा केंद्र (व्ही.एल.ई चालक) व्दारे खोटे नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र ग्राहकाला दिल्याप्रकरणी पारोळा पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पारोळा तालुक्यातील तामसवाडी येथे सुनील मोतीलाल बिरारी हे व्हीएलई चालक आहेत. त्यांनी दि. 27 सप्टेंबर 2023 रोजी चेतन अर्जुन पाटील (राहणार करमाड) यांना खोटे नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र बनवून देऊन अर्जदार व शासनाची देखील फसवणूक केली आहे. याप्रकरणी पारोळा तहसीलदार उल्हास भाईदास देवरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून दि. ३१ रोजी २०२४ रोजी पारोळा पोलिसामध्ये गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक अमरसिंग वसावे हे पुढील तपास करीत आहेत.

हेही वाचा:

Back to top button