

नाशिक, सिडको : पुढारी वृत्तसेवा- मोबाईलवर स्टेटस ठेवून तलवार घेऊन फिरणाऱ्या आरोपीस अंबड पोलिसांनी पेलिकन पार्क परिसरातून ताब्यात घेऊन अटक केली आहे. पोलिसांनी त्याच्या कडील तलवार जप्त केली आहे.
या बाबत पोलिसांनी सांगितले की, संशयित विलास भागडे (वय ३२) रा. दत्तनगर अंबड याने तलवारसह मोबाईल वर स्टेटस ठेवून सिडकोतील पेलिकन पार्क भागात फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या नंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक नदीम शेख व त्यांचा पथकाने पेलिकन पार्क भागात सापळा रचून संशयित विलास भागडे याला ताब्यात घेतले. या नंतर त्याची तपासणी केली असता त्याच्याकडे तलवार मिळाली. या प्रकरणी संशयित विलास भागडे याच्यावर गुन्हा दाखल करून अटक केली आहे. त्याच्याकडील तलवार जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणी पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पोलिस हवालदार पंकज शिरवले व पोलिस शिपाई रविंद्र कोळी करीत आहेत.
हेही वाचा :