कोल्हापूर : चेन्नई येथील कुस्ती स्पर्धेत म्हाकवेच्या सोहमला सुवर्णपदक | पुढारी

कोल्हापूर : चेन्नई येथील कुस्ती स्पर्धेत म्हाकवेच्या सोहमला सुवर्णपदक

म्हाकवे, पुढारी वृत्तसेवा : म्हाकवे येथील मल्ल सोहम सुनील कुंभार याने चेन्नई येथे सुरू असलेल्या खेलो इंडिया कुस्ती स्पर्धेत 52 किलो वजन गटात सुवर्णपदक पटकावले.

त्याने शालेय कुस्ती स्पर्धेत देशाचे नेतृत्व करून जकार्ता येथे द्वितीय क्रमांक मिळवला होता. गरीब कुटुंबातील भट्टी मजूर याचा सोहम मुलगा आहे. आत्तापर्यंत अनेक स्पर्धेत त्यांनी यश मिळवले आहे. त्याला मुख्याध्यापक पी. बी. भारमल, पै. रवींद्र पाटील, वस्ताद चोपडे यांचे मार्गदर्शन लाभले. तो सध्या म्हाकवे इंग्लिश स्कूल म्हाकवे या शाळेत शिकत आहे.

हेही वाचा 

Back to top button