Dhule News : प्रजासत्ताक दिनी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते ध्वजारोहण | पुढारी

Dhule News : प्रजासत्ताक दिनी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते ध्वजारोहण

धुळे ; पुढारी वृत्तसेवा– भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 74 व्या वर्धापन दिनानिमित्त ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ शुक्रवार, दिनांक 26 जानेवारी, 2024 रोजी सकाळी ठिक 9.15 वाजता पोलीस कवायत मैदान, धुळे येथे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज, पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांचे हस्ते होणार आहे.

प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमास लोकप्रतिनिधी, स्वातंत्र्य सैनिक, शहिद जवानांच्या पत्नी व वीरमाता, विरपिता, शौर्य पुरस्कार विजेते, राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सर्व शासकीय अधिकारी, कर्मचारी, माध्यम प्रतिनिधी, इतर मान्यवर, विद्यार्थी आणि नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी केले आहे.

जास्तीत जास्त नागरिकांना या शासकीय समारंभात भाग घेता यावा यासाठी दिनांक 26 जानेवारी, 2024 रोजी सकाळी 8.30 ते 10.00 वाजेच्या दरम्यान ध्वजारोहणाचा किंवा इतर कोणताही शासकीय किंवा अर्ध शासकीय समारंभ करण्यात येवू नये. जर एखाद्या कार्यालयास अथवा संस्थेला आपला स्वतःचा ध्वजारोहण समारंभ करावयाचा असल्यास त्यांनी तो समारंभ सकाळी 8.30 च्या पूर्वी किंवा 10.00 वाजेच्यानंतर करावा असेही गोयल यांनी कळविले आहे.

हेही वाचा :

Back to top button