Divyah Khosla Kumar : ‘हिरो हिरोईन’चं पहिलं पोस्टर रिलीज; दिव्या खोसला कुमार मुख्य भूमिकेत

Divyah Khosla Kumar
Divyah Khosla Kumar

पुढारी ऑनलाईन डेस्क : 'टॉयलेट: एक प्रेम कथा', 'पॅडमॅन' आणि 'परी' यांसारखे हिट चित्रपटानंतर निर्मात्या प्रेरणा अरोरा यांनी आणखी एक नवा सिनेमा चाहत्यांच्या भेटीस आणला आहे. या धमाकेदार चित्रपटाचे नाव 'हीरो हिरोईन' असे आहे. या चित्रपटाचे नुकतेच एक नवे पोस्टर सोशल मीडियावर रिलीज करण्यात आलं आहे. यामुळे चित्रपटासाठी चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. ( Divyah Khosla Kumar )

संबंधित बातम्या 

'हीरो हिरोईन' या चित्रपटात बॉलिवूड अभिनेत्री दिव्या खोसला कुमारने ( Divyah Khosla Kumar ) मुख्य भूमिका साकारली आहे. धमाकेदार चित्रपट तेलुगु-हिंदी द्विभाषिक एक रोमॅन्टिक प्रेम कहाणी दाखविण्यात आली आहे. हा चित्रपट सुरेश कृष्णा दिग्दर्शित केला आहे. नुकतेच लाँच करण्यात आलेल्या पोस्टरमध्ये दिव्या ब्लॅक रंगाच्या वनपीसमध्ये खूपच ग्लॅमरस दिसत आहे. याशिवाय तिच्या पुढे कॅमेऱ्याने फोटो काढणारे काही लोक दिसतात. तर आजूबाजूला ही काही लोंकाची गर्दी दिसून येत आहे. हे पोस्टर सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहे. वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास दिव्या खोसला शेवटची 'यारियाँ २' या चित्रपटात दिसली होती.

अभिनेत्री दिव्याने चित्रपटातील तिच्या भूमिकेविषयी सांगितले आहे की, 'हा एक मंत्रमुग्ध करणारा अनुभव होता. चित्रपट ग्लॅमरस आणि मोहकतेचे मिश्रण करणारा असा आहे. मला या चित्रपटाचा भाग होता आले याचा मला अभिमान आहे. खूपच उत्सुक आणि भावनिक आहे.' निर्मात्या प्रेरणा अरोरा म्हणाल्या की, "हिरो हिरोईन' या चित्रपट खूपच सुंदर आणि रोमॅन्टिक आहे. चित्रपटाची कथा रंजक वळणावर पोहचतेय." मात्र, निर्मात्यांनी अद्याप चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केलेली नाही.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news