जळगाव ; पुढारी वृत्तसेवा येथील महाराष्ट्र राज्य वीज कामगार महासंघाचे प्रश्न गेल्या ४ वर्षांपासून प्रलंबित आहेत. त्याबाबत सातत्याने पाठपुरावा करून देखील प्रशासनाने गंभीर दुर्लक्ष केलेले आहे. त्यामुळे आता परत महासंघाने आंदोलन व उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.
महाराष्ट्र राज्य वीज कामगार महासंघातर्फे कामगारांच्या विविध मागण्यांबाबत २०२० साली प्रशासनाला अवगत करण्यात आले होते. त्याबाबत प्रशासनाने अजूनही सकारात्मकता दाखविलेली नाही. त्यामुळे सातत्याने स्मरणपत्रे देऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांचे महासंघाने लक्ष वेधून घेतले. आज तीन वर्ष पूर्ण होऊन गेली तरीदेखील सर्व प्रश्नांची सोडवणुक आज अखेर करण्यात आलेली नाही. संघटनेतर्फे दोनवेळा आंदोलनात्मक भूमिका घेण्यात आली. मात्र तेव्हा प्रशासनाने कालावधी मागून घेत प्रश्न सोडविण्याचे केवळ आश्वासन दिले. मात्र त्याची पूर्तता झालेली नाही.
त्यामुळे आता पुन्हा एकदा प्रजासत्ताक दिनी २६ जानेवारी रोजी विभागीय कार्यालयासमोर कार्यालयीन वेळेत एकदिवसीय धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. यावेळी कामगार महासंघाचे सदस्य हे मोठ्या संख्येने एकत्र येऊन प्रशासनाचा दिरंगाईबाबत निषेध करणार आहेत. त्यानंतर २९ जानेवारीपासून बेमुदत उपोषण करण्यात येणार आहेत. तरी आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन महाराष्ट्र वीजकामगार महासंघाच्या वतीने करण्यात आले आहे.
हेही वाचा :