Supriya Sule : रोहित पवारांची ईडीकडून चौकशी सुरू : सुप्रिया सुळे म्हणाल्या… | पुढारी

Supriya Sule : रोहित पवारांची ईडीकडून चौकशी सुरू : सुप्रिया सुळे म्हणाल्या...

पुढारी ऑनलाईन डेस्क : देशात सुडाचे राजकारण सुरू आहे. विरोधकांवर दडपशाही सुरू आहे, हे आपण मागील दहा वर्षांपासून पाहत आलो आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्यावरील ईडी कारवाईचे आपणाला नवल वाटत नाही, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली. त्या प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या. Supriya Sule

महाराष्ट्र राज्य सहकारी (एमएससी) बँक घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस-शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांची आज (दि.२४) ईडीकडून चौकशी सुरू आहे. यावर सुळे यांनी ‘सत्यमेव जयते’ असे म्हणून प्रतिक्रिया देताना  त्या पुढे म्हणाल्या की, नवाब मलिक, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ आदी नेत्यांची ईडीकडून चौकशी करण्यात आली. त्यांच्या कुटुंबीयांचीही चौकशी करण्यात आली. यावेळी त्यांच्या कुटुंबीयांना झालेला त्रास आपण जवळून पाहिलेला आहे. तुरुंगातही भेट घेऊन त्यांना आधार दिला आहे. Supriya Sule

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बँनर्जी यांनी लोकसभा निवडणूक स्वतंत्र लढविण्याची घोषणा आज केली आहे, यावर सुळे म्हणाल्या की, बँनर्जी सर्व परिस्थिती नीटपणे हाताळतील. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुटी पडली आहे, याची सुनावणी सुरू झाली आहे. याचा निकालही शिवसेनाप्रमाणे लागेल. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाकडे पक्ष आणि चिन्ह जाईल, अशा परिस्थितीत तुमची भूमिका काय राहणार यावर सुळे म्हणाल्या की, याचा काहीही परिणाम होणार नाही. कारण राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांच्या राजकीय जीवनात वेगवेगळ्या ४ चिन्हांवर निवडणुका लढवून जिंकून दाखविल्या आहेत, असे त्यांनी यावेळी सांगितले.

हेही वाचा 

Back to top button