जळगाव : ड्रग्स रॅकेट धंद्यांवर कारवाई करा ; आमदारांची डीपीडीसीच्या बैठकीत मागणी | पुढारी

जळगाव : ड्रग्स रॅकेट धंद्यांवर कारवाई करा ; आमदारांची डीपीडीसीच्या बैठकीत मागणी

जळगाव; जिल्ह्यात जळगावसह भुसावळ या ठिकाणी ड्रग्स व अवैध धंद्यांचा सुळसुळाट झालेला आहे. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये अवैध धंदे करणाऱ्यांचा खुला सुळसुळाट असतानाही पोलीस प्रशासन शांत बसलेले आहे. संबधितांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी डी पी टी सी च्या बैठकीत आमदार मंगेश चव्हाण, आमदार संजय सावकारे, आमदार किशोर पाटील यांनी पालकमंत्र्यांकडे केली तर पालकमंत्र्यांनी यावर कारवाई करण्याचे आदेश दिले.

जिल्ह्यामध्ये ड्रग्स व्यवसाय करणाऱ्यांचा सुळसुळाट झाला आहे. तसेच अवैध व्यवसाय करणाऱ्यांना मोकळीक मिळालेली आहे. या दोन्ही व्यवसाय करणाऱ्यांवर पोलीसांचा कोणताही लगाम नाही. (दि. 5) रोजी कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठामध्ये झालेल्या जिल्हा नियोजन बैठकीमध्ये आमदार मंगेश चव्हाण, आमदार किशोर पाटील, आमदार संजय सावकारे यांनी पालकमंत्र्यांकडे हा प्रश्न उपस्थित केला की या अवैध धंद्यावर व ड्रग्सचा व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी.

भुसावळ येथील युवतीला ड्रग्स पाजून तीन युवकांकडून अत्याचार करण्यात आला. बाजारपेठ पोलीस ठाण्यात युवती गेली असता तिला तक्रार मागे घेण्यास भाग पाडले. यामध्ये एका मोठ्या नेत्याचा व ड्रग्स विक्रेत्याच्या सांगण्यावरून पोलिसांनी प्रकरण दाबण्यालाचा आरोप आमदार मंगेश चव्हाण यांनी केला. संशयित आरोपीकडे 15 ग्रॅम ड्रग सापडले असताना पोलिसांनी आर्मी ॲक्टचा गुन्हा दाखल केल्याचा आरोप सत्ताधारी आमदार मंगेश चव्हाण व आमदार संजय सावकारे यांनी जिल्हा नियोजन बैठकीत केला.

जागोजागी अवैध धंदे फोफावले असताना पोलीस प्रशासन फक्त बघ्याची भूमिका घेत असल्याचेही दिसत असल्याचे म्हटले.
जिल्हा नियोजन बैठकीत बड्या नेत्याचे सीडीआर व पोलीस निरीक्षक यांची चौकशी करा अशी मागणी करण्यात आली. या प्रकरणात चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले.

जिल्ह्याच्या विकासाच्या बैठकीमध्ये अवैध धंदे व ट्रक्स माफिया यांच्यावर पोलीस प्रशासन कारवाई करण्यात यावी ही बाब लोकप्रतिनिधींनी उचलून धरावी असा प्रकार प्रथमच घडला. अवैध व्यवसाय करणाऱ्या पोलिसांचे कोणतेही नियंत्रण नसल्याचे यावरून दिसून येत आहे.

हेही वाचा :

Back to top button