साक्रीतील खांडबारा, खटयाळ, शिव येथे विकसित भारत संकल्प यात्रा  | पुढारी

साक्रीतील खांडबारा, खटयाळ, शिव येथे विकसित भारत संकल्प यात्रा 

धुळे : पुढारी वृत्तसेवा-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून विकसित भारत संकल्प यात्रेचे देशभरात आयोजन करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर आज विकसित भारत संकल्प यात्रा साक्री तालुक्यातील ग्रामपंचायत खांडबारा, खटयाळ, शिव येथे उत्साहात संपन्न झाली.

केंद्र सरकारच्या प्रमुख योजनांचा लाभ लक्षीत घटकापर्यंत वेळेत पोहचावा यासाठी केंद्र सरकारकडून विकसित संकल्प यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. केंद्र शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी पात्र असलेले मात्र अद्याप ज्यांना लाभ मिळू न शकलेल्या पात्रताधारक व्यक्तिंना केंद्र शासनाच्या महत्वाकांक्षी योजनांची माहिती या एलईडी व्हॅनमार्फत देण्यात येत आहे. आहे. तसेच पात्र लाभार्थ्यांकडून विविध योजनांचे अर्ज भरुन घेण्यात येत आहे.

साक्री तालुक्यातील खांडबारा,खटयाळ,शिव गावात झालेल्या कार्यक्रमात मान्यवराच्या उपस्थित लाभार्थ्यांना आयुष्मान भारत कार्डचे वितरण करण्यात आले.यात्रेत उज्वला गॅस नोंदणी, आयुष्मान कार्डचे वाटप करण्यात आले. तसेच नागरिकांची आरोग्य तपासणीही करण्यात आली. यात्रेदरम्यान लाभार्थ्यांकडून विविध योजनांचे अर्ज भरुन घेण्यात आले तसेच यावेळी नागरिकांना योजनेची माहिती पुस्तिकचे वाटप करण्यात आले.यावेळी मेरी कहानी मेरी जुबानी अंतर्गत लाभार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रारंभी यात्रेचे स्वागत ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थांच्यावतीने करण्यात आले. या कार्यक्‌रमांस सरपंच,उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य, अंगणवाडी कार्यकर्ती, मदतनीस, आशा वर्कर, बचत गट अध्यक्ष, ग्रामस्थ व लाभार्थी तसेच विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते

हेही वाचा :

Back to top button