Maharashtra Co-operative Bank Scam : महाराष्ट्र सहकारी बँकेच्या घोटाळ्याप्रकरणी ईडीची ६ ठिकाणी झाडाझडती | पुढारी

Maharashtra Co-operative Bank Scam : महाराष्ट्र सहकारी बँकेच्या घोटाळ्याप्रकरणी ईडीची ६ ठिकाणी झाडाझडती

पुढारी ऑनलाईन डेस्क : महाराष्ट्र सहकारी बँकेच्या कथित घोटाळ्याच्या संदर्भात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) महाराष्ट्रातील ६ ठिकाणी आज (दि.५) झाडाझडती घेतली. Maharashtra Co-operative Bank Scam  बँकेच्या घोटाळ्याप्रकरणी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाच्या चौकशीच्या संदर्भात ईडीने सहा ठिकाणी झाडाझडती घेतली आहे. यामध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे पुतणे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्याशी संबंधित असलेल्या पुणे आणि पिंपरी-चिंचवड जिल्ह्यातील बारामती अॅग्रो प्रा.लि.चा समावेश आहे.

दरम्यान, आमदार रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो कंपनीवर केंद्रीय तपास यंत्रणेने धाड टाकल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.  शुक्रवारी (दि. ५) सकाळी केंद्रीय तपास यंत्रणेचे पथक येथे पोहोचले.  या कंपनीच्या कार्यालयात अन्य लोकांना प्रवेश देणे बंद करण्यात आले आहे. आमदार रोहित पवार यांची ही कंपनी आहे. अजित पवार हे राज्य सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर पवार कुटुंबात उभी फूट पडली आहे. त्यानंतर आमदार रोहित पवार यांच्या कंपन्यांना सातत्याने केंद्रीय व राज्यातील यंत्रणांकडून टार्गेट केले जात आहे. दरम्यान या प्रकरणी कंपनी प्रशासनाकडून कोणीही प्रतिक्रिया दिलेली नाही.  केंद्रीय तपास यंत्रणांकडूनही अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

हेही वाचा 

Back to top button