Nashik Accident : इगतपुरीजवळ पहाटे भीषण अपघात; 3 जागीच ठार, 1 गंभीर जखमी | पुढारी

Nashik Accident : इगतपुरीजवळ पहाटे भीषण अपघात; 3 जागीच ठार, 1 गंभीर जखमी

इगतपुरी : पुढारी वृत्तसेवा; नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी मुंबई आग्रा महामार्गावरील इगतपुरी येथील बोरटेंभे जवळ (दि. 1) भीषण अपघात झाला. या अपघातात भरधाव वेगाने जाणाऱ्या मर्सिडीज कारने भाजीपाला घेऊन जाणाऱ्या आयशरला पाठीमागून जोरदार धडक दिली. यात 3 जण जागीच ठार झाले असून एकजण गंभीर जखमी आहे.

आज पहाटे चार वाजेच्या दरम्यान हा अपघात झाला.  अपघात इतका भीषण होता की ३ जण जागीच ठार झाले तर १ जण गंभीर जखमी आहे. धडक इतकी जोरात होती की, (MH 02 EX 6777) या क्रमांकाच्या मर्सिडीज कारचा चक्काचूर झाला आहे. जखमींना पुढील उपचारासाठी नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच रूट पेट्रोलिंग टीम, टोल प्लाझा रुग्णवाहिका आणि महामार्ग पोलिस घोटी इगतपुरी पोलीस पथक यांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य केले. या अपघातामुळे काही काळ वाहतुक ठप्प झाली होती.

हेही वाचा :

Back to top button