पिंपळनेरला मोफत नेत्रतपासणी, रक्तदान व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर | पुढारी

पिंपळनेरला मोफत नेत्रतपासणी, रक्तदान व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर

पिंपळनेर : (जि. धुळे) पुढारी वृत्तसेवा- तुलसी आय हॉस्पिटल नाशिक, नवजीवन ब्लड बॅक धुळे व राजे छत्रपती इंग्लिश मिडियम स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी, रक्तदान व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर झाले. या शिबिरात तालुक्यातील पिंपळनेर, सामोडे, चिकसे, बल्हाणे, देशशिरवाडे, देगांव, दिघावे, कुडाशी, वार्सा, मांजरी, डांगशिरवाडे गावातील 271 पेक्षा अधिक गरीब गरजूंनी आपले डोळे तपासणी करून घेतली. 151 दात्यांनी रक्तदान केले. त्यापैकी 68 लोकांची डोळ्यांची मोतिबिंदू शस्त्रक्रिया नाशिक येथील तुलसी आय हॉस्पिटल मध्ये मोफत करण्यात येणार आहे.

या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष संभाजी अहिरराव, उपाध्यक्ष शामशेठ कोठावदे, सचिव रा.ना.पाटील, संचालक जगदीश ओझरकर, डॉ.अजित बागुल, नेत्रविशारद डॉ. घुले, डॉ. अहिरे, मुख्याध्यापिका सोनाली पाटील,मगन अहिरे, भरत बागुल, अनिल बोराडे, कृष्णा भोये, एस.डी.पाटील, शाम दुसाने आदी मान्यवर उपस्थित होते.

विद्यार्थ्यांनी सजवलेल्या वर्गाची व विद्यार्थींनींनी काढलेल्या रांगोळ्यांची पहाणी मान्यवरांनी केली.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी सोनाली पाटील, अमोल अहिरे, मुस्ताक शेख, बाळासाहेब गायकवाड, मनोज थॉमस, राणी सूर्यवंशी, निसार बेग, विद्या पाटोळे, आफरीन शेख, सविता भदाणे, शैला एखंडे, स्मिता एखंडे, दिपिका देवरे, गायत्री साळुंखे, रेश्मा रामचंद्रन या शिक्षकांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका सोनाली पाटील यांनी केले. सुत्रसंचलन अमोल अहिरे यांनी तर आभार मुस्ताक शेख यांनी मानले.

हेही वाचा :

Back to top button