पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : अयोध्येत प्रभू श्रीरामाच्या मंदिराचा लोकार्पण सोहळा 22 जानेवारी रोजी संपन्न होणार आहे. या सोहळ्यासाठी पिंपरी- चिंचवड शहरातील चौघडावादक रमेश पाचंगे यांची निवड करण्यात आली आहे. राम मंदिरात पिंपरीतील चौघड्याचे नाद घुमणार आहेत. ही शहरासाठी मोठी अभिमानास्पद बाब आहे. रमेश पाचंगे हे गेल्या 40 वर्षांपासून चौघडावादन करतात. चौघडावादनासारखी पारंपरिक कलेचा वारसा आजही त्यांनी जपला आहे. त्यांच्या गेल्या पाच पिढ्यांपासून हे चौघडा वादन करत आहेत. रमेश पाचंगे यांनी वयाच्या दहाव्या वर्षापासून चौघडा वादनास सुरुवात केली.
अयोध्येत प्रभू श्रीरामाच्या मंदिराचं स्वप्न अखेर कित्येक वर्षांनी पूर्ण होत आहे. या मंदिराचा लोकार्पण सोहळा काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. रमेश पाचंगे म्हणाले, आयोध्येमध्ये मला वादनाची संधी मिळणार याचा मला खूप आनंद झाला आहे. पवनाथडी झाल्यानंतर 16 ते 17 जानेवारी दरम्यान मी अयोध्येला जाणार आहे. अयोध्येच्या राम मंदिराचे खजिनदार गिरी महाराज यांनी माझी निवड केली आहे.
हेही वाचा