येवल्यातील जुन्या शिवसैनिकांचा शिंदे गटात प्रवेश | पुढारी

येवल्यातील जुन्या शिवसैनिकांचा शिंदे गटात प्रवेश

येवला : पुढारी वृत्तसेवा; तालुक्यात शिवसेना शिंदे गटाने ठाकरे गटाला मोठा धक्का दिला असून, येथील ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख किशोर सोनवणे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. शिवसेनेचे सचिव भाऊसाहेब चौधरी, संपर्कप्रमुख सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा झाला.

या प्रवेश सोहळ्यात अंदरसूल येथील ग्रा.पं. सदस्य तथा ठाकरे गटाचे उपतालुकाप्रमुख अमोल सोनवणे, किशोर बागूल, संतोष वल्टे, संदीप शेळके आदींनी तालुकाप्रमुख पांडुरंग शेळके यांच्या नेतृत्वाखाली शिंदे गटात प्रवेश केला. त्यामुळे ठाकरे गटाला तालुक्यात मोठे खिंडार पडले आहे. दरम्यान, मुख्यमंत्री शिंदे यांचे हात बळकट करण्यासाठी प्रत्येक गावातून शिवसैनिकांना शिवसेनेत (शिंदे गट) घेऊन सन्मान दिला जाणार असल्याचे पांडुरंग शेळके-पाटील यांनी सांगितले.

हेही वाचा :

Back to top button