Malaika Arora : इकडे अरबाजचं लग्न, तिकडे मलायका ख्रिसमस पार्टीवर

मलायका-अरहान-अरबाज खान -शौरा खान
मलायका-अरहान-अरबाज खान -शौरा खान
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : मलायका एक्स हसबँड अरबाज खानच्या लग्नाला गेली नाही. ती आपल्या मित्रांसमवेत ख्रिसमस पार्टी एन्जॉय करताना दिसली. या पार्टीचे काही फोटोज समोर आले आहेत. अरबाज खानने मेकअप आर्टिस्ट शौरा खानशी लग्न केले आहे. (Malaika Arora) खान परिवार आनंदाच्या भरात आहे. अनेक बॉलिवूड सेलेब्स या कपल वेडिंगमध्ये हजर राहिले. पण, मलायका मात्र दिसली नाही. तिने आपल्या मित्रांसमवेत ख्रिसमस पार्टी एन्जॉय केली. या वेळी तिने अनेक फोटोज सोशल मीडियावर शेअर केले. केवळ इतकचं नाही तर मलायकाची ख्रिसमस पार्टीमध्ये अर्जुन कपूर दिसत नाहीये. आता फॅन्स दोघांच्या रिलेशनशीपवरून पुन्हा प्रश्न उपस्थित करत आहेत. (Malaika Arora)

video-viralbhayani  insta वरून साभार

संबंधित बातम्या –

२१ वर्षांचा मुलगा अरहान खान आपल्या वडिलांच्या लग्नात सहभागी झाला होता. तो ऑल ब्लॅक लूकमध्ये दिसला. त्याशिवाय, सलमान खान, यूलिया वंतुर, सलीम खान, सलमा खान, हेलनसहित टीव्ही जगतातील अनेक स्टार्स या लग्नात सहभागी झाले होते. निकाहनंतर एक पार्टी ठेवण्यात आली, ज्यामध्ये गायक हर्षदीप कौरने परफॉर्म केलं.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

दरम्यान, सलमान खानने अरबाज खानची एक्स वाईफ मलायका अरोराला ख्रिसमस गिफ्ट पाठवले. मलायकाने इन्स्टाग्राम स्टोरीवर फोटोदेखील शेअर केला. यामध्ये सलमान खानच्या टीमकडून तिला Being Human चे गिफ्ट पॅक पाठवण्यात आले होते. गिफ्ट बॉक्समध्ये सांताक्लॉजची कॅप, गुडीज, चॉकलेट, छोटे-छोटे गिफ्ट दिसत होते. याची झलक इन्स्टा स्टोरीवर पाहायला मिळते. गिफ्टसोबत मलायकासाठी एक सुंदर ख्रिसमस मेसेज लिहिण्यात आला. सलमानने काही दिवसांपूर्वी घोषणा केली होती की, बीईंग ह्युमन न्यू वूमेन कलेक्शन लॉन्च करणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news