File Photo
यवतमाळ
यवतमाळ: बसमध्ये चढणाऱ्या महिलेची पर्स लांबविली; ३ लाखांचा ऐवज लंपास
यवतमाळ : पुढारी वृत्तसेवा : येथील बसस्थानक चोरट्यांचा अड्डा बनला आहे. येथे सातत्याने चोऱ्या होत असूनही पोलिसांकडून कोणतीच ठोस पावले उचलली जात नाही. नागपूर बसमध्ये चढताना महिलेच्या पर्समधून रोख एक लाख २० हजार आणि दोन लाख २० हजार रुपये किंमतीचे ३५ ग्रॅम वजनाचे दागिने चोरीला गेले. Yavatmal
सुधा तेलंग (रा. किन्ही) ही महिला एस.टी. बसने नागपूर जाण्यासाठी यवतमाळ बसस्थानकावर आली होती. बसमध्ये चढत असताना अज्ञात चोरट्याने त्यांच्या पर्समधून हातचलाखीने रोख रक्कम व सोन्याचे दागिने काढून घेतले. याची तक्रार देण्यासाठी अवधूतवाडी पोलिस ठाण्यात पोहोचलेल्या महिलेला दागिन्याचे बिल आणण्यास सांगितले. त्यामुळे शनिवारी या प्रकरणात गुन्हा दाखल झाला नाही. रविवारी महिलेने बिल दिल्यानंतर दागिने व रोख चोरल्याप्रकरणी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा नोंद केला. Yavatmal
हेही वाचा

