Nashik News : सरपंच, ग्रामसेवकांचा संप स्थगित | पुढारी

Nashik News : सरपंच, ग्रामसेवकांचा संप स्थगित

नाशिक: पुढारी वृत्तसेवा- विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी जिल्हयातील सरपंच, सदस्य, ग्रामसेवक, ग्रामरोजगार सेवक, ग्रामपंचायत कर्मचारी, संगणक परिचालक यांनी जिल्हयात सोमवारपासून सुरु केलेला लाक्षणिक संप मागे घेण्यात आल्याची माहिती ग्रामसेवक संघटनेचे नेते कैलास वाघचौरे यांनी दिली.

गेल्या तीन दिवसांपासून जिल्हयातील सुमारे 1388 ग्रामपंचायतींमधील कामकाज ठप्प झाले होते. या संपाला, सरपंच परिषद, जिल्हा ग्रामसेवक युनियन, ग्रामरोजगार सेवक संघटना, महाराष्ट्र राज्य, महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटना आदींनी पाठिंबा दिला होता. संपादरम्यान राज्यपातळीवर ग्रामपंचायत कार्यालये बंद ठेवण्याचा निर्णय झाला होता. यात नाशिक जिल्हयातील सर्व ग्रामसेवक आंदोलनात सहभागी होते. संपापुर्वी राज्यातील जिल्हा ग्रामसेवक संघटनेच्या ऑनलाईन बैठकीत तीन दिवसीय बंदचा निर्णय घेण्यात आला होता.

हेही वाचा :

Back to top button