Khanderao Maharaj Yatrotsav Ozar : अश्वाने क्षणार्धात ओढले बारागाडे, श्वास रोखून धरलेल्या लाखो भाविकांचा एकच जल्लोष

ओझर येथील खंडेराव महाराज यात्रेनिमित्त बारागाडे सोहळ्या निमित्त झालेली गर्दी.
ओझर येथील खंडेराव महाराज यात्रेनिमित्त बारागाडे सोहळ्या निमित्त झालेली गर्दी.
Published on
Updated on

ओझर (जि. नाशिक): पुढारी वृत्तसेवा; मावळत्या सुर्यनारायणाच्या साक्षीने येळकोट येळकोट जय मल्हारच्या घोषात अन् लाखो भाविकांच्या उपस्थितीत अश्वाने क्षणार्धात बारागाडे ओढले आणि श्वास रोखून धरलेल्या लाखो भक्तांनी एकच जल्लोष करत आसमंत दणाणून सोडला. निमित्त होते महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या ओळखल्या जाणाऱ्या ओझर येथील श्री खंडेराव महाराज यात्रा उत्सवाचे. भंडाऱ्याच्या उधळणीने अवघा आसमंत जणूकाही सुवर्णमय झाला होता. या भक्तिमय सोहळ्याचा आनंद घेण्यासाठी जिल्ह्यातील हजारो भाविक उपस्थित होते. त्यांच्या डोळ्यांचे या क्षणांनी पारणे फेडले. (Khanderao Maharaj Yatrotsav Ozar)

जेजुरीनंतरची महाराष्ट्रातील सर्वात मोठी यात्रा म्हणून ख्याती असलेल्या येथील श्री खंडेराव महाराज यात्रा उत्सवास प्रारंभ झाला. सकाळी ओझर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी किरण देशमुख, महेश शेजवळ, पराग पगार आदिंच्या हस्ते पारंपरिक पध्दतीने ग्रामपूजा केली. यात्रा कमिटीकडून वाजत-गाजत संबळच्या तालावर वाघ्या-मुरळी यांच्या प्रमुख उपस्थितीत मांडव डहाळ्याचा कार्यक्रम झाला. बारा गाडे ओढणाऱ्या अश्वाला शाहीस्नान घालून देवभेट घडवून आणली. शहरातील प्रमुख मार्गावरून मिरवले. यावेळी भंडाऱ्यची उधळण करण्यात आली. बाराही गाडे यात्रा मैदानावर आल्यानंतर मानाच्या मोंढ्याच्या अर्थातच देवाच्या गाड्याला जोडले. श्री खंडेराव महाराज कि जय येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात जणुकाही श्री खंडेराव महाराज यांचा संचार झालेल्या अश्वाने हे गाडे ओढले. (Khanderao Maharaj Yatrotsav Ozar)

यात्रेचे यशस्वी नियोजन अध्यक्ष परशराम शेलार, उपअध्यक्ष प्रशांत चौर, नवनाथ चौधरी, सतिश पगार, युवराज शेळक, कार्याध्यक्ष रामू पाटील, खजिनदार शिवा शेजवळ, सहखजिनदार दत्तू घोलप, संघटक सचिन शिवले, सहसंघटक संजय शिंदे, सुरेश कदम, कामेश शिंदे, राकेश जाधव, पराग बोरसे, बापु चौधरी, प्रशांत पगार यांच्यासह यात्रा कमेटीने केले होते.

चित्तथरारक कसरतींनी वेधले लक्ष (Khanderao Maharaj Yatrotsav Ozar)

सायंकाळी सुर्यास्तावेळी शहरातील चारही दिशांनी आलेले बारागाडे यांचे यात्रा मैदानावर वाजत गाजत भंडाऱ्याची उधळण करीत आगमन झाले. यात कदमांचा कलगीतुरा गाडा, पगार गवळी, शिंदे, चौधरी, घोलप शिवले यांचा गाडा भडके रासकर यांचा गाडा मधला व वरचा माळीवाडा ,शेजवळ यांच्या गाड्यांचा समावेश होता गाड्यावरील खांबांवर मल्लांनी चित्तथरारक कसरती करत उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news