Hanuman trailer : सर्वात बलशाली…; साऊथ स्टार तेजा सज्जाच्या ‘हनुमान’चा ट्रेलर रिलीज | पुढारी

Hanuman trailer : सर्वात बलशाली...; साऊथ स्टार तेजा सज्जाच्या 'हनुमान'चा ट्रेलर रिलीज

पुढारी ऑनलाईन डेस्क : प्रशांत वर्मा दिग्दर्शित आणि साऊथ अभिनेता तेजा सज्जा, अभिनेत्री अमृता अय्यर यांचा बहुप्रतिक्षित आगामी तमिळ ‘हनुमान’ हा चित्रपट लवकरच चाहत्यांच्या भेटीस येत आहे. या चित्रपट पौराणिक कथेवर आधारित आहे. नुकतेच ‘हनुमान’ चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर ( Hanuman trailer ) सोशल मीडियावर रिलीज झाला आहे. ट्रेलर पाहून चाहत्यांनी अभिनेत्याने खूपच कौतुक केलं आहे.

संबंधित बातम्या 

व्हायरल झालेल्या तीन मिनिटांच्या ट्रेलरमध्ये सुरूवातील नदीचा प्रवाह आणि डोंगरदऱ्यामधून ‘जय श्री राम’ च्या नावाचा आवाज कानी येकू येतो. दरम्यान गेल्या अनेक वर्षापासून श्री रामाचा भक्त हनुमान एक गुहेत बर्फाने आच्छादलेल्या भल्यामोठ्या दगडात तप करत बसल्याचे पाहायला मिळतेय. शेवटी तो त्यातून बाहेर येवून अभिनेता तेजाला मदत करतो आणि सत्याच्या बाजूने लढताना दाखविलं आहे. दरम्यान भारदस्त अॅक्शन सीन, जंगल, प्राणीही ट्रेलरमध्ये पाहायला मिळतात.

यानंतर पुढे ‘अथांग महासागराच्या भूगर्भात, तिन्ही जगात सर्वात बलशाली, महावीर हनुमानचा रक्त रत्न, सहस्त्र वर्ष प्रतिक्षा करत आहे.’ असे डॉयलॉग बोलले जात आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांनी अभिनयासोबत कलाकारांचे भरभरून कौतुक केलं आहे. ( Hanuman trailer )

हा व्हिडिओ प्राईम शो एंटरटेनमेंटच्या युट्यूब चॅनेलवर व्हायवर झाला आहे. हा चित्रपट १२ जानेवारी २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात तेजा सज्जासोबत अमृता अय्यर, वरलक्ष्मी सरथकुमार, राज दीपक शेट्टी आणि विनय राय यांनी भारदस्त भूमिका साकारल्या आहेत. हा चित्रपट तेलगू, हिंदी, कन्नड, तमिळ या भाषेत सर्वत्र पाहायला मिळणार आहे.

Back to top button