Dhule Pimpalner : साहेबराव नंदन ताहाराबादकर यांना माणुसकी भूषण गौरव पुरस्कार | पुढारी

Dhule Pimpalner : साहेबराव नंदन ताहाराबादकर यांना माणुसकी भूषण गौरव पुरस्कार

पिंपळनेर, जि. धुळे पुढारी वृत्तसेवा- मलकापूर, जि. बुलडाणा येथील बहुउद्देशीय सामाजिक विधायक आरोग्य विषयाशी निगडीत राहून गेल्या पाच वर्षांपासून अखिल महाराष्ट्र राज्यातून सेवाभाव ठेऊन कार्य करणाऱ्या माणूसकी मल्टीपर्पज फाउंडेशनने यंदाच्या वर्षी प्रथमच सर्वच क्षेत्रातील गुणीजनांना विविध पुरस्कार जाहीर केले आहेत. त्यातच संस्थेचा मानाचा राज्यस्तरीय माणूसकी भूषण गौरव पुरस्कार 2023 सगर समाज भूषण, कवी, लेखक, संपादक गावगाडाकार साहेबराव नंदन ताहाराबादकर यांना जाहीर करण्यात आला आहे. हा पुरस्कार 16 डिसेंबर रोजी बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर येथे मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.

साहेबराव नंदन यांना यापूर्वीही शेकडो सन्मानपत्र, स्मृतीचिन्ह, विविध राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले आहेत. साहेबराव नंदन यांचा गौरव, सन्मान हा उत्तर महाराष्ट्राचाच नव्हे तर सगर समाजाचाही गौरव असल्याची प्रतिक्रिया शिक्षण महर्षी कविवर्य संभाजीराव यशवंत पगारे यांनी व्यक्त केली.

त्यांच्या या निवडीचे सगर समाजातून आनंद व्यक्त करण्यात येत आहे. साहित्य क्षेत्रात समाजाचा झेंडा सातासमुद्रापार रोवला जावो अशा प्रतिक्रिया देखील समाजातील सर्वच जेष्ठांनी बोलून दाखवल्या आहेत. त्यांच्या या पुरस्काराबद्दल ए. टी. पाटील, कवयित्री सुनिता महाजन, सुरेखा आहेर, ललितभाऊ साळवे, तान्हाजी खोडे, अनिकेत सोनवणे, आर.के. पाटील, हभप. रामचंद्र महाराज नंदन, किरण पगारे, कैलास तानकर, साहेबराव गवळी, डॉ. साहेबराव क्षीरसागर, राजेंद्र साळवे, अशोक पाटील, पुष्पलता पगारे, हेमंत पगारे, निंबाजी पाटील, प्रकाश जाधव, राजेंद्र गवळी व नाशिक धुळे विभागातून साहित्यिक व सगर समाज बांधवांनी कौतुक केले.

हेही वाचा :

Back to top button