Dhule Sakri : अखेर सहाव्या दिवशी गुलाब पवार यांनी उपोषण सोडले | पुढारी

Dhule Sakri : अखेर सहाव्या दिवशी गुलाब पवार यांनी उपोषण सोडले

पिंपळनेर:(ता.साक्री)पुढारी वृत्तसेवा– सामाजिक कार्यकर्ते गुलाब पवार यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी साक्री तहसील कार्यालयासमोर 30 नोव्हेंबर पासून आमरण उपोषण सुरू केले होते. दरम्यान पाच डिसेंबर रोजी सायंकाळी प्रकल्पाधिकारी प्रमोद पाटील, साक्रीचे तहसीलदार साहेबराव सोनवणे, पोलीस निरीक्षक मोतीराम निकम यांच्या मध्यस्थीने उपोषणकर्त्यांनी लिंबू सरबत घेऊन आपले उपोषण मागे घेतले आहे.

याबाबतचे लेखी पत्रही प्रशासनाच्या वतीने गुलाब पवार यांना देण्यात आले आहे. या उपोषणाला तालुक्यातील विविध राजकीय पक्षांसह संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन आपला पाठिंबा दर्शविला होता तर तब्येत खालावत जात असल्यामुळे त्यांना उपोषण मागे घेण्याबाबत विनंती केली जात होती. दरम्यान उपोषणकर्ते गुलाब पवार यांना विविध आदिवासी संघटनाच्या वतीने उपोषण सोडण्याबाबत विनंती करण्यात आल्याने या विनंतीला मान देत त्यांनी हे उपोषण मागे घेतले आहे.

हेही वाचा :

Back to top button