जळगाव : पोलिसही जरांगे पाटलांचे चाहते, फोटो अन् सेल्फी’चा आवरेना मोह | पुढारी

जळगाव : पोलिसही जरांगे पाटलांचे चाहते, फोटो अन् सेल्फी'चा आवरेना मोह

जळगाव; मराठ्यांना सरसकट आरक्षण मिळण्यासाठी मनोज जारंगे पाटील यांनी गावी-गावी जाऊन मराठ्यांची वज्रमुठ तयार करण्याचा विडा उचललेला आहे. यासाठी दि. 3 व 4 रोजी ते जळगाव जिल्ह्यात आले होते. त्यावेळेस जामनेर भुसावळकडे जात असताना जामनेरचे पोलीस निरीक्षक व त्यांच्या कर्मचाऱ्यांनाही त्यांच्याबरोबर सेल्फी घेण्याचा मोह आवरला नाही व त्यांनी हद्द क्षमताच जरांगे पाटलांबरोबर सेल्फी व फोटो काढले व आठवणी कैद केल्या.

मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन सुरू केलेले आहे. हे आंदोलन राज्यातील सर्व मराठ्यांनी एकजूट व्हावे व सर्वांना सरसकट आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात जाऊन मराठ्यांना एकजूट करण्याचे आवाहन करीत आहे. जामनेर तालुक्यात ते सभेसाठी आले असता सभा संपल्यानंतर भुसावळकडे रवाना होत असताना जामनेर पोलिसांची हद्द संपल्यानंतर जामनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किरण शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत सेल्फी व फोटो काढले. सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी मनोज जारंगे पाटील यांच्यासोबत सेल्फी घेतली.

हेही वाचा

Back to top button