Nashik News : नाशिकरोड रेल्वे स्थानकात बॉम्ब ठेवल्याची अफवा | पुढारी

Nashik News : नाशिकरोड रेल्वे स्थानकात बॉम्ब ठेवल्याची अफवा

नाशिकरोड , पुढारी वृत्तसेवा येथील रेल्वे स्थानकात बॉम्ब ठेवल्याची माहिती देणारा कॉल पोलिसांना आल्याने मोठी खळबळ उडाली होती. यानंतर पोलिसांनी तातडीने बॉम्ब शोधक पथकाला कळवत संपुर्ण नाशिकरोड रेल्वे स्थानकाची तपासणी केली. तपासणी नंतर बॉम्ब नसल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांना बॉम्ब असल्याची माहिती देणारा मोबाईल अज्ञात व्यक्तीने बंद ठेवल्याची माहिती जीआरपीएफ व आरपीएफ विभागातील पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.

25 नोव्हेंबर रोजी दुपारी चार वाजता डायल नंबर 112 वर गोकुळ कासार आणि निखिल कुऱ्हे यांना अज्ञात व्यक्तीने कॉल करून नाशिक रोड रेल्वे स्थानकात बॉम्ब ठेवल्याची माहिती दिली. दरम्यान नाशिकरोड आणि देवळाली रेल्वे स्थानकाची तपासणी करण्यात आली असता येथे बॉम्ब अथवा बॉम्ब सदृश वस्तू मिळुन आली नाही. याप्रसंगी प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक महेश कुलकर्णी, आरपीएफचे निरीक्षक हरफूलसिंग यादव, स.पो.नि.बालाजी शेंडगे, रायटर विजय कपिले, शैलेश पाटील, दीपक निकम, भगवान बोडके, उत्तम सिरसाट, महिला हवालदार चेतना सिरसाट, हरफूल सिंह यादव, नरेंद्र कुमार पाठक, जे पी राजपूत, ललित कोकल, एन के राघव, विशाल पाटिल, सचिन गायसमुद्रे, संतोष यादव, मनीष कुमार, महेश कुमार आदींनी रेल्वे स्थानकावर बॉम्बची तपासणी केली.

प्रवश्यामध्ये घबराट
रेल्वे स्थानकात चेकिंग चालू असताना प्रवाशांमध्ये थोडावेळ घबराट निर्माण झाली होती. परंतु संपूर्ण स्थानकाची कसून तपासणी केली असता काही संशयास्पद आढळून आले नाही. त्यामुळे प्रवाशांनी सुटकेचा श्वास सोडला.

हेही वाचा :

Back to top button