Nashik News : चाळीस रुपये दरासाठी नदीत दूध ओतून आंदोलन 

Nashik News : चाळीस रुपये दरासाठी नदीत दूध ओतून आंदोलन 
Published on
Updated on

कसबे सुकेणे (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा; कसबे-सुकेणे (निफाड) पंचक्रोशीतील कसबे सुकेणेसह मौजे सुकेणे, ओणे, थेरगाव, दात्याणे, जिव्हाळे, वडाळी आदी गावांतील दूध उत्पादक शेतकऱ्यांनी येथील बाणगंगा नदीत दूध ओतून घसरत्या दूध दराच्या पार्श्वभूमीवर आंदोलन केले. कसबे सुकेणे व मौजे सुकेणे दरम्यान चांदोरी रोडवर शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन करत दुधाला ४० रुपये दराची मागणी करताना शासनाचा जोरदार निषेध केला.

सध्या दुधाला केवळ २२ ते २५ रुपये असा अल्प दर मिळत आहे. हा दर म्हणजे दूध उत्पादक शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा असून, दुधाला किमान ४० रुपये प्रतिलिटर दर मिळावा, अशी मागणी करण्यात आली. रोजगार नसल्याने शेतकऱ्यांची मुले शेतीला जोडव्यवसाय म्हणून दुधाकडे वळाला आहे. मात्र, आज दुधाला २२ ते २५ रुपये प्रतिलिटर दर मिळत असून, दूध व्यवसायातील तोट्याने गाई विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. अगोदरच चाऱ्याच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. शासनाने दूध उत्पादक शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केल्यास २०२४ च्या निवडणुकीत सरकारला झटका देऊ. दुधाला किमान ४० रुपये दर दिला तरच शेतकऱ्याला काहीतरी रुपयाला रुपया शिल्लक राहील, अन्यथा दूध उत्पादक शेतकरी उद्ध्वस्त होतील, असे विचार याप्रसंगी शेतकऱ्यांनी व्यक्त केले.

यावेळी भाऊसाहेब हळदे, बाळू जाधव, विजय मोगल, संजय मोगल, योगेश मोगल, दिलीप मोगल, सुभाष भंडारे, सुभाष भंडारे, विशाल शेवकर, बाळू तिडके, विष्णू जाधव, गोकुळ भंडारे, दौलत हिरे, योगेश भंडारे, बाबूराव फटांगळे, उद्धव आवारे आदींसह दूध उत्पादक शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सद्यस्थितीत दुधाला २० ते २५ रुपये प्रतिलिटर भाव मिळत असून, हा दर शेतकऱ्यांना न परवडणारा आहे. गाई-म्हशींच्या वाढलेल्या किमती, दुष्काळजन्य परिस्थिती, चाऱ्याची टंचाई, शेतीचा दुग्धोत्पादन हा जोड व्यवसाय या सर्व गोष्टींचा विचार करता किमान ४० रुपये प्रतिलिटर दुधाला दर मिळणे अपेक्षित आहे. अन्यथा शासनाला याचे परिणाम भोगावे लागतील.

– भाऊसाहेब हाळदे, दूध उत्पादक शेतकरी, ओणे

नगरमध्येसुद्धा दूध आंदोलन चालू आहे. किमान ४० रुपये प्रतिलिटर दर मिळावा व या दूध आंदोलनाची याची दखल शासनाने घ्यावी, यासाठी बाणगंगा नदी दूध ओतून शासनाचा निषेध करत आहोत.

– योगेश भंडारे, दूध उत्पादक शेतकरी, कसबे सुकेणे

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news