नाशिक : एक लाखाची लाच मागणारा सहकार अधिकारी जाळ्यात

नाशिक : एक लाखाची लाच मागणारा सहकार अधिकारी जाळ्यात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; तक्रारदाराच्या सावकारीचा अहवाल वरिष्ठांकडे सकारात्मक पाठविण्याच्या मोबदल्यात १ लाख रुपयांची लाच मागणाऱ्या निफाडच्या सहकार अधिकाऱ्याविरोधात मुंबईनाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. राजेश शंकर ढवळे (५३, रा. कृष्णा अपार्टमेंट, चेतनानगर, इंदिरानगर) असे लाच मागणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव आहे.

निफाड येथील सहाय्यक निबंधक सहकारी संस्थेतील वर्ग एकचे सहकार अधिकारी संशयित राजेश ढवळे याने तक्रारदाराकडे सुरुवातीस दीड लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. सावकारीचा अहवाल सकारात्मक करून ताे वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्याच्या मोबदल्यात ढवळे याने ६ सप्टेंबरला ही लाच मागितली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तक्रारीची शहानिशा करीत सापळा रचला. संशयित ढवळे याने पंचासमक्ष तडजोड करीत एक लाख रुपयांची लाच स्वीकारण्याची तयारी दर्शविली. मात्र रक्कम घेण्यास टाळाटाळ करीत होता. त्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी (दि.९) दुपारी लाचखोर ढवळेविरोधात लाचेची मागणी केल्याप्रकरणी मुंबई नाका पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.

मालेगावलाही 'ट्रॅप'

मालेगाव येथील दुय्यम निंबधक कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी (दि.९) सापळा रचून एकास लाच घेताना पकडले. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लाचखोर व्यक्ती खासगी व्यक्ती असून तिने शासकीय लोकसेवकासाठी लाच स्विकारल्याचा संशय विभागास आहे. त्यामुळे रात्री उशीरापर्यंत याप्रकरणी तपास व गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news