Weather Update : मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाड्यात पाऊस शक्य

Weather Update : मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाड्यात पाऊस शक्य

पुणे : पुढारी वृत्तसेवा : राज्यातील दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात पुढील दोन दिवस मेघगर्जनेसह हलक्या पावसाची शक्यता आहे. रविवारनंतर कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम कमी होऊन राज्यभरात हवामान कोरडे राहिल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, कमी दाबाचे क्षेत्र पूर्व-मध्य अरबी समुद्रावर आहे. मात्र या कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता कमी होत आहे.

आग्नेय दिशेने येणार्‍या बाष्पयुक्त वार्‍यामुळे दक्षिण महाराष्ट्रात आर्द्रतेत वाढ झाली आहे. त्याचा परिणाम म्हणून पुढील दोन दिवस दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड व गोव्यात मेघगर्जनेसह हलक्या पावसाचा अंदाज आहे. दक्षिण मध्य महाराष्ट्रात कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, पुणे, बीड, नगर, धाराशिव आणि लातूर येथे हलक्या पावसाची शक्यता आहे

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news