नंदुरबार : तरुणाचा खून करुन, मृतदेह विहिरीत फेकला | पुढारी

नंदुरबार : तरुणाचा खून करुन, मृतदेह विहिरीत फेकला

नंदुरबार ; पुढारी वृत्‍तसेवा

तालुक्यातील मालपुर फाट्याजवळ वन विभागाच्या  विहरीत तरुणाचा मृतदेह आढळून आला. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. संजय राजेंद्र मोरे (पाटील) (वय २९ रा. शनिमांडळ ता. जि. नंदुरबार ) असे मृताचे नाव आहे. त्‍याचा खून करुन पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह विहिरीत टाकला असवा, असे प्राथमिक अंदाज पाेलिसांनी व्‍यक्‍त केला आहे.

या प्रकरणी पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  १4 नोव्हेंबर राेजी  तरुणाचा नग्न अवस्थेतील मृतदेह एका कापडी चादरीमध्ये बांधून वैदाणे ते मालपुर डांबरी रोडलगत असलेल्या राखीव वनक्षेत्र कक्ष क्र. ४३७ मधील विहरीत टाकलेला आढळून आला. पाेलिसांनी घटनास्थळी पहाणी केली.

अज्ञात कारणावरुन संजय राजेंद्र मोरे  याचा खून करुन पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह विहिरीत टाकला असावे, किंवा अन्य ठिकाणी मारून मग त्याचा मृतदेह विहिरीत टाकला असावा, असा प्राथमिक अंदाज पाेलिसांनी व्‍यक्‍त केला आहे. हेड काँन्स्टेबल ज्ञानेश्वर सामुदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.  तपास पोलीस उपनिरीक्षक कमलाकर चौधरी करीत आहेत.

हेही वाचलं का?

Back to top button