Manoj Jarange Patil : जरांगे पाटील यांच्या प्रकृतीसाठी मुक्ताईनगरात महामृत्युंजय यज्ञ | पुढारी

Manoj Jarange Patil : जरांगे पाटील यांच्या प्रकृतीसाठी मुक्ताईनगरात महामृत्युंजय यज्ञ

जळगांव : पुढारी वृत्तसेवा ; राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न पेटला आहे. शांततेत सुरु असलेल्या या आंदोलनाला आता हिंसक स्वरुपाचे वळण आले असून राज्यात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी सरकारला 40 दिवसांचा अवधी देऊनही मराठा आरक्षणावर सरकारने निर्णय न दिल्याने जरांगे यांनी पुन्हा उपोषण सुरु केले असून त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावते आहे. अशात त्यांच्या तब्बेतीत सुधारणा व्हावी. ती उत्तम राहावी यासाठी मुक्ताईनगर येथील सकल मराठा समाजाच्या वतीने महामृत्यूंजय यज्ञाचे आयोजन करण्यात आले.

संबधित बातम्या :

अंतरवाली-सराटी येथे मनोज जरांगे  (Manoj Jarange Patil) पाटील यांनी काही दिवसांपूर्वी उपोषण केले होते. त्यानंतर सरकारने त्यांना तीस दिवसांचा कालावधी मागितला होता व तीस दिवस दिवसांच्या आत आरक्षण देणार असे आश्वासन दिले होते. जरांगे यांनी त्यावेळेस सरकारला ४० दिवसांचा कालावधी दिला व ४० दिवसांच्या आत आरक्षण न मिळाल्यास मी माझ्या मराठा समाजासाठी पुन्हा आंदोलन करेल असा इशारा दिला होता.

मनोज जरांगे (Manoj Jarange Patil)पाटलांनी सरकारला दिलेला चाळीस दिवसांचा कालावधी संपल्यानंतर जरांगे पाटील यांनी पुन्हा उपोषण सुरू केलेले आहे.  उपोषणामुळे त्यांची तब्येत खालावलेली असून सरकारने त्यांच्या तब्येतीकडे पाहता तात्काळ मराठा आरक्षण जाहीर करून जरांगे पाटील यांचे आंदोलन तात्काळ थांबावे अशी मागणी मराठा समाजातील तरुणांतर्फे करण्यात आली. तसेच त्यांची खालावलेली तब्येत लवकरात लवकर बरी होण्यासाठी मराठा तरुणांतर्फे महामृत्युंजय यज्ञाचे आयोजन करण्यात आले.

यावेळी किशोर बापू गावंडे, जगदीश शेट निकम, किरण महाजन, विकी मराठे, रवींद्र जाधव, सुनील पाटील, डॉ.विवेक सोनवणे, सोपान कळसकर, निलेश पाटील, गुणवंत पाटील, किशोर घटे, मयूर पाटील, सचिन पाटील, चेतन पाटील, प्रदीप पाटील उपस्थित होते.

हेही वाचा :

Back to top button