नाशिक : जिल्हा शासकीय रूग्णालयात ‘स्त्री जन्माचे’ अनोखे स्वागत | पुढारी

नाशिक : जिल्हा शासकीय रूग्णालयात 'स्त्री जन्माचे' अनोखे स्वागत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; जिल्हा शासकीय रूग्णालय नाशिक येथे 23 ऑक्टोबर 2023 रोजी नवरात्र उत्सवात अष्ठमीच्या दिवशी रात्री 12.00 वाजेनंतर ज्या मुलींनी जन्म घेतला त्या मुलींच्या आई, वडील व नवजात बालीकांचा सन्मान जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते करण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी दिली आहे.

या सोहळ्यास अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रमोद चौधरी, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप सुर्यवंशी, स्त्रीरोग तज्ञ विभाग प्रमुख पदव्युत्तर महाविद्यालय डॉ. किरण पाटोळे, डॉ. उत्कर्ष दुधाडीया, डॉ.रोहन बोरसे, डॉ.प्रतीक भांगरे, डॉ.बाळू पाटील, मेट्रेन शुभांगी वाघ, ॲङ सुर्वणा शेफाळ, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. राहुल हाडपे, जिल्हा रूग्णालयातील अधिकारी, नर्सिंग स्टाफ व कर्मचारी उपस्थित होते.

स्त्री जन्माचे स्वागत सन्मानाने व्हावे यासाठी जिल्हा शासकीय रूग्णालयातील पी.सी.पी.एन.टी.डी कार्यक्रमांतर्गत दरवर्षी हा उपक्रम राबविण्यात येतो. यावेळी 4 मातांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी प्रसूती कक्ष रांगोळी, तोरण, फुगे लावून सजविण्यात आला होता. नवजात बालिकांच्या मातांना साडी, ओटी भरण करून औक्षण करण्यात आले. नवजात बालीकांना नवीन कपडे व त्यांच्या वडीलांना शाल देवून सन्मानित करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी जन्म झालेल्या पालकांना शुभेच्छा देवून स्त्री जन्माचे स्वागत आनंदाने करण्याचे आवहन याप्रसंगी केले. असेही जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी सांगितले आहे.

Back to top button