Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी नांदगावी साखळी उपोषण | पुढारी

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी नांदगावी साखळी उपोषण

नांदगाव : पुढारी वृत्तसेवा ; नांदगावी सकल मराठा समाज आणि अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने येथील पोलीस ठाण्यासमोर साखळी उपोषण सुरु करण्यात आले आहे.

सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन मराठ्यांचा ओबीसी प्रवर्गात समावेश करावा, कोपर्डी अत्याचार प्रकरणातील आरोपींना तत्काळ फाशी देण्यात यावी, मराठा आरक्षणासाठी हुतात्मा झालेल्या बांधवांच्या वारसांना दिलेल्या आश्वसनांची तत्काळ पुर्तता करण्यात यावी, संपूर्ण आरक्षणाच्या नियमानुसार दर १० वर्षांनी सर्व्हे करण्यात येऊन प्रगत जाती बाहेर काढण्यात याव्या, सारथी संस्थेमार्फत पी. एच. डी. करणाऱ्यांचे सर्व प्रश्न तातडीने मार्गी लावावे, राज्यातील मराठा समाजाला ५० टक्के च्या आत मराठा म्हणून वेगळा प्रवर्ग करुन आरक्षण दिले तरी चालेल पण एन.  टी. व्ही. जे. एन. टी. चा प्रवर्ग टिकला तसा टिकला तरच आम्ही आरक्षण घेणार ५० टक्के च्या वर आरक्षण घेणार नाही आदी मागण्यांसाठी हे उपोषण करण्यात येत आहे.

राज्यात सध्या मराठा आरक्षण मुद्दा गाजत असून नांदगाव मध्ये देखील मराठा समाजाच्या वतीने उपोषण सुरु करण्यात आले आहे. या उपोषणास तालुक्यातील विविध संघटनांनी पाठींबा दिला आहे.

हेही वाचा :

Back to top button