हमासचा सैतानी चेहरा : इस्रायलीं नागरिकांवर रसायनिक हल्ले करण्याचा होता कट | Hamas chemical weapons against Israel | पुढारी

हमासचा सैतानी चेहरा : इस्रायलीं नागरिकांवर रसायनिक हल्ले करण्याचा होता कट | Hamas chemical weapons against Israel

Hamas chemical weapons against Israel : इस्रायलला मिळाले पुरावे

पुढारी ऑनलाईन डेस्क : इस्रायल आणि हमास यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होत चालले आहे. तसेच इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धाचा विकृत चेहराही पुढे येऊ लागला आहे. ७ ऑक्टोबर २०२३ला हमासने इस्रायलवर ५ हजार रॉकेट डागले होते, तसेच हमासेच दहशतवादी इस्रायलमध्ये घुसले होते. या दहशतवाद्यांना इस्रायली नागरिकांविरोधात संहारक रसायनिक शस्त्रे वापरण्याचे आदेश होते, हे आता स्पष्ट झाले आहे. (Hamas chemical weapons against Israel)

जेरुसलेम पोस्ट या वेबसाईटने ही बातमी दिली आहे. हमासचे बरेच दहशतवादी इस्रायलने दिलेल्या प्रत्युत्तरात मारले गेले. यातील काही दहशतवाद्यांकडे cyanide dispersion devices हे शस्त्र मिळाल्यानंतर हा प्रकार उघकीस आला आहे.

सायनाईड वापरण्याचा होता कट | Hamas chemical weapons against Israel

हमासच्या दहशतवाद्यांनी दक्षिण इस्रायलवर ७ ऑक्टोबरला हल्ला केला. त्यासंदर्भात इस्रायलचे राष्ट्राध्यक्ष इसाक हेरजॉग यांनी बरीच माहिती दिली आहे. स्काय न्यूज या टीव्ही चॅनलला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणतात, “मारण्यात आलेल्या दहशतवाद्यांकडे काही USB Key मिळाल्या आहेत, त्यात हल्ला कसा करावा, लहान मुलांना मारण्याबद्दलच्या सूचना आणि cyanide dispersion devices कसे वापरावे याची माहिती होती.”

तीन दहशतवादी संघटनांशी सामना

“हमासच्या दहशतवाद्यांकडे जी माहिती होती, ती अधिकृतरीत्या अल कैदाकडे असणारी माहिती आहे. म्हणजेच आम्ही हमास, अल कैदा आणि आयएसआयएस या तीन दहशतवादी संघटनांशी एकाच वेळी लढत आहोत.

पाणी रोखल्याची माहिती चुकीची

इस्रायलने गाझा पट्टीचे पाणी रोखल्याची माहिती खोटी आहे, असे ही ते म्हणाले. “हमासने जो रॉकेट हल्ला केला, त्यात गाझातील वीज यंत्रणा कोलमडून गेली. आणि गाझातील फक्त ७ टक्के पाण्यावर इस्रायलचे नियंत्रण आहे. तसेच मानवी कार्यासाठी पुरेसा इंधन पुरवठा उपलब्ध आहे.”

हेही वाचा

Back to top button