Jalgaon News : चाळीसगावात घरफोडी, सहा लाखांचे दागिने केले लंपास

घरफोडी
घरफोडी

जळगांव : चाळीसगाव येथे चोरट्यांनी घरफोडी करत तब्बल सहा लाखांच्या दागिन्यांवर डल्ला मारला आहे. कोतकर कॉलेज जवळ राहणारे नंदकिशोर शर्मा हे कामानिमित्त गावात गेले असता चोरट्यांनी डाव साधला. चोरट्याने घराचे कुलूप तोडून सहा लाख 28 हजार रुपये किमतीचा सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

चाळीसगाव शहरातील आरडी टावर कोतकर कॉलेज जवळ प्लॉट नंबर 303 येथे नंदकिशोर रामेश्वर शर्मा हे राहतात. ते साजन कलेक्शन या ठिकाणी अठरा रोजी दुपारी 2.30 ते 3. 30 वाजेच्या दरम्यान साड्या घेण्यासाठी गेले होते. तेथून घरी परत आल्यावर घराला लावलेले कुलूप तुटलेले दिसले. घराची पाहणी केली असता कपाटाच्या लॉकरमध्ये ठेवलेले 1 लाख 44 हजार रुपये किमतीचा सोन्याचा नेकलेस, 88 हजाराचा 22 ग्रॅम चा सोन्याचा नेकलेस, 64 हजाराचा 16 ग्रॅम चा नेकलेस, 40 हजार रुपये किमतीची दहा ग्रॅम सोन्याची चैन, 72 हजाराच्या 18 ग्राम सोन्याच्या अंगठ्या, 80 हजार रुपये किमतीचा वीस ग्रॅम पाटल्या, 80 हजाराच्या वीस ग्रॅम सोन्याच्या बांगड्या,40 हजाराचे कानातले, 20 हजार रुपये किमतीचे 5 ग्रॅम चे सोन्याचे बारीक चेन असे एकूण सहा लाख 28 हजार रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लंपास केला. या प्रकरणी चाळीसगाव शहर पोलिसात गुन्हा नोंदवण्यात  आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक योगेश माळी हे करीत आहे.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news