नाशिकच्या पळसे गावात आमदार, खासदार यांना प्रवेश बंदी ; ‘हे’ आहे कारण | पुढारी

नाशिकच्या पळसे गावात आमदार, खासदार यांना प्रवेश बंदी ; 'हे' आहे कारण

नाशिकरोड ,पुढारी वृत्तसेवा; आमदार, खासदार यांना पळसे गावात प्रवेश बंदी केली असल्याची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. त्यामुळे गुरुवारी (दि.१९) ३:३० वाजता आमदार, खासदार यांना निमंत्रित केलेल्या केंद्र शासनाच्या प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्राच्या ऑनलाईन उद्घाटनाला आमदार सरोज आहिरे आणि खासदार हेमंत गोडसे येतात की नाही?, याविषयी उत्सुकता लागून आहे.

नाशिक पुणे रस्त्यावरील संवेदनशील म्हणून पळसे गावाची ओळख आहे. राजकारणात देखील पळसे गाव सतत अग्रेसर असते. याच गावात आज सकल मराठा समाजाच्या नावाने सोशल मीडियात एक पोस्ट व्हायरल होतांना दिसत आहे. मराठा समाजाचा ओबीसीत समावेश करावा, तसेच मराठा आरक्षण मिळावे या मागणीसाठी गुरुवार पासून खासदार आणि आमदार यांना पळसे गावात गावबंदी करीत असल्याचे पोस्ट मध्ये म्हटले आहे.

केंद्र शासनातर्फे प्रमोद महाजन ग्रामीण विकास कौशल्य विकास केंद्र या कार्यक्रमाचे ऑनलाईन उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुरुवारी ३: ०० वाजता होणार आहे. या पार्श्वभूमीवर पळसे गावात ऑनलाईन उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी खासदार हेमंत गोडसे, आमदार सरोज अहिरे तसेच केंद्रीय मंत्री भारती पवार यांना निमंत्रित केले आहे. त्यामुळे आता या कार्यक्रमाला खासदार, आमदार आणि मंत्री महोदय उपस्थित राहतात की नाही, याविषयी उत्सुकता आहे.

विरोधकांचा राजकीय स्टंट

प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्राचे आज पळसे गावात ऑनलाईन उद्घाटन होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हे उद्घाटन होणार आहे. या पार्श्वभूमीवर गावातील राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसेच्या काही मोजक्या पदाधिकाऱ्यांनी राजकीय स्टंट म्हणून सकल मराठा समाजाच्या नावाने पोस्ट सोशल मीडियात व्हायरल केली आहे. यासाठी जिल्ह्यातील सकल मराठा समाजाच्या कोणत्याही कार्यकर्त्या सोबत चर्चा केली नाही, असा आरोप आयोजकांतर्फे करण्यात येत आहे.

व्हायरल झालेली पोस्ट

हेही वाचा :

Back to top button