बॉम्बवर्षांवाने गाझा पट्टीची चाळण, दहशतवादी संघटनेच्‍या आणखी एक मोहरक्‍याचा खात्‍मा | पुढारी

बॉम्बवर्षांवाने गाझा पट्टीची चाळण, दहशतवादी संघटनेच्‍या आणखी एक मोहरक्‍याचा खात्‍मा

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : इस्‍त्रालय -हमास युद्धाचा आज ( दि.19 ) तेरावा दिवस आहे. बाराव्‍या दिवशी म्‍हणजे बुधवारी मध्‍यरात्री इस्‍त्रालयने बॉम्बवर्षांवाने गाझा पट्टीची चाळण सुरुच ठेवली आहे. या हल्‍ल्‍यात १२ हून अधिक दहशतवाद्यांसह संघटनेचा म्‍होरक्‍या ठार झाल्‍याचा दावा इस्‍त्रायल संरक्षण मंत्रालयाने केला आहे. इस्‍त्रायल विरोधी लष्‍करी कारवाईत ठार झालेल्‍या दशतवाद्याचे नाव रफत अबू हिलाल असे आहे.  पॅलेस्टिनी इस्लामिक जिहाद संघटनेचा तो म्‍होरक्‍या होता. ( Israel-Hamas War )

१२ हून अधिक दहशतवादी ठार

पॅलेस्टिनी आणि अरब मीडियाच्या वृत्तानुसार, बुधवारी रात्रभर इस्रायली हवाई हल्ले गाझाला लक्ष्य  केले. या हल्‍ल्‍यात डझनभर दहशतवादी ठार झाले, पॅलेस्टिनी रेड क्रिसेंट सोसायटीने दिेलेल्‍या माहिनीसार, वेस्ट बँकमध्ये सुमारेश पाच पॅलेस्टिनींना ठार मारले आहे. खान युनूसमध्ये, 1२२ यनिवासी इमारती नष्ट झाल्या, परिणामी जीवितहानी झाली असल्‍याचे म्‍हटले आहे. दरम्‍यान गाझाच्या मध्यभागी असलेल्या अल-जहरामध्ये पाच निवासी टॉवर्सचे सपाटीकरण करण्यात आले. इमारतींना लक्ष्य करण्यापूर्वी जवळपास १०० कुटुंबांनी इमारती रिकामी केल्या. ते आता निवारा शोधत रस्त्यावर उतरले आहेत. गुरुवारी सकाळी इस्रायलने केलेल्‍या हल्ल्यात 40 हून अधिक पॅलेस्टिनी ठार झाले आहेत. ( Israel-Hamas War )

युद्‍धाच्‍या 13 व्या दिवशी इस्रायली युद्ध विमाने गाझा पट्टीवर मारा करत आहेत, .वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, गाझा शहराच्या दक्षिणेकडील खान युनिस येथील घरावर जेट विमानांनी हल्ला केल्याने सात मुलांसह नऊ जण ठार झाले.दक्षिण गाझा पट्टीतील रफाह येथे इस्रायली हवाई हल्ल्यात 30 हून अधिक पॅलेस्टिनी ठार आणि डझनभर जखमी झाले, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. इस्त्रायली युद्धविमानांनी रफाहमधील ताल अल-सुलतान परिसरातील एका घरावरही हल्ला केला असून यामध्ये अनेक जण ठार झाले आहेत.

 

Back to top button