जळगाव| डेंग्यू साथीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करावेत : जिल्हाधिकारी

जळगाव| डेंग्यू साथीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करावेत : जिल्हाधिकारी
Published on
Updated on

जळगाव, पुढारी वृत्तसेवा; जिल्ह्यात डेंग्यूच्या साथीचा प्रादुर्भाव वाढला असून डेंग्यूच्या साथीवर तात्काळ नियंत्रण मिळविण्यासाठी आरोग्य प्रशासनाने फिल्डवर जात शर्तीचे प्रयत्न करावेत‌ अशा सूचना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आज येथे दिल्या.

जिल्ह्यातील डेंग्यू साथीच्या प्रादुर्भावाचा आढावा जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. याप्रसंगी‌ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, महानगरपालिका आयुक्त डॉ. विद्या गायकवाड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर, नगरपालिका प्रशासन सहायक आयुक्त जनार्दन पवार, शासकीय वैद्यकिय महाविद्यालयाचे वैद्यकिय अधीक्षक डॉ. विजय गायकवाड आदी यावेळी उपस्थित होते.

जिल्ह्यामध्ये डेंग्यू साथीचा प्रसार झाल्याचे अतिजोखमीचे २० ठिकाणे तपासणीत निष्पन्न झाली असून या ठिकाणी नागरिकांनी अतिदक्षता बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तापाची लक्षणे जाणवणाऱ्या शंभर टक्के रुग्णांची डेंग्यू आजाराची तपासणी करण्यात यावी. सूचनांचे पालन न झाल्यास दोषींविरुध्द कारवाईचा करण्यात यावी. असे आदेश जिल्हाधिकारी आयुष्य प्रसाद यांनी दिले आहे. यामध्ये मुख्यतः जळगाव शहर, भुसावळ शहर वरणगाव जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी यावर मुक्ताईनगर मधील पातोंडी धरणगाव जळगाव मधील म्हसावद हे महत्त्वाचे ठिकाणे असून इतर अजूनही गावे यामध्ये समाविष्ट आहेत.

घराच्या परिसरात पाणी साचू देऊ नका, डबक्याच्या स्वरुपात जमा झालेले पाणी प्रवाहीत करावे, अथवा त्यावर माती टाकून खड्डे बुजविण्यात यावेत, ही कार्यवाही ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिकाद्वारे करण्यात यावी. कायमस्वरुपी पाण्याचा स्त्रोत असलेली ठिकाणे परंतू जिथे स्वच्छ पाणी साचून आहे. अशी ठिकाणे उदा. नदी, नाले, तलाव, विहीरी यात प्राथमिक आरोग्य केंद्राद्वारे गप्पी मासे सोडण्यात यावीत.

आशा कर्मचारी यांचेद्वारे सर्वेक्षण करणेत यावे. डास उत्पत्तीची ठिकाणे नष्ट करण्यात यावी. परिसरात डास निर्मूलनासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र/ग्रामपंचायत/नगरपालिका /महानगरपालिका यांचेद्वारे फवारणी करण्यात यावी. फवारणी करतेवेळी खाद्यपदार्थांवर होणार नाही याचीही काळजी घ्यावी. फवारणी प्रसंगी लहान मुलांची विशेष काळजी घ्यावी. नागरिकांनी मच्छरदाणीचा वापर करावा.शक्य झाल्यास घराबाहेर पडतांना पूर्ण अंगभर कपडे वापरल्यास, डासांमूळे होणारे आजार होण्याचे प्रमाण कमी होईल. भरपूर पाणी प्यावे.अशा सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिल्या.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news