Jalgaon Crime : जळगाव जिल्ह्यातील नऊ तालुक्यात चोरट्यांचा धुमाकूळ | पुढारी

Jalgaon Crime : जळगाव जिल्ह्यातील नऊ तालुक्यात चोरट्यांचा धुमाकूळ

जळगाव : जळगाव जिल्ह्यात चोरट्यांचा धुमाकूळ सुरू आहे. जिल्ह्यातील नऊ तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात चोरीच्या घटना घडल्या आहेत. भुसावळ, मुक्ताईनगर, पारोळा, अडावद, जळगाव शहर, जळगाव तालुका आणि जामनेर या तालुक्यातील पोलीस ठाणे हद्दीत मोटरसायकल, मोबाईल, शेतातील हरभरा, वाहनांची जाळपोळ अशा विविध प्रकारच्या चोरीच्या घटना घडल्या आहेत.

  • भुसावळ येथील बाजारपेठ पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या रजा टॉवर येथे अज्ञात चोरटा चाकूचा धाक दाखवून बारा हजार रुपये किमतीचा मोबाईल आणि दोनशे रुपये रोख रक्कम घेऊन पसार झाला.
  • मुक्ताईनगर येथे पुणे जाण्यासाठी ट्रॅव्हल ऑफिस वर आलेल्या प्रवाशाला अज्ञात तीन जणांनी दहा हजार दोनशे रुपयांच्या ऐवज, त्यामध्ये चांदीचा ब्रेसलेट आणि पाच हजार रुपये रोख घेऊन पसार झाले.
  • पारोळा येथील एका शेतातून पंधरा हजार रुपयाची पाण्याची मोटर चोरीला गेली.
  • रामानंद नगर जळगाव शहर, चोपडा शहर आणि जळगाव तालुका या तीन ठिकाणावरून पंधरा हजार रुपये, २५ हजार रुपये आणि २५ हजार रुपये अशा तीन मोटरसायकली घेऊन पसार झाले.
  • चोपडा तालुक्यातील मौजे वडती शेतामधून एक ते दीड लाख रुपयांच्या हरभरा चोरून नेण्यात आला. या प्रकरणी पाच जणांविरुद्ध अडावद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
  • जामनेर पोलीस स्टेशन अंतर्गत दोन लाख रुपये किमतीची यामाहा मोटरसायकल आणि ३५ हजार रुपये किमतीचे किर्लोस्कर कंपनीचे २० किलो बॅटचे जनरेटर मशीन जाळून टाकण्यात आले. या प्रकरणी जामनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी या गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे.

Back to top button