Nashik News : नाना पटोलेंच्या उपस्थितीत सोमवारी काँग्रेसचा मेळावा | पुढारी

Nashik News : नाना पटोलेंच्या उपस्थितीत सोमवारी काँग्रेसचा मेळावा

नाशिक: पुढारी वृत्तसेवा, आगामी लोकसभा, विधानसभा तसेच महापालिका व जिल्हा परिषद पंचायत समित्यांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी (दि.९) नाशिकमधील काँग्रेसचा उत्तर महाराष्ट्रस्तरीय मेळावा आयोजित केला आहे. (Nashik News)

तपोवन रोडवरील जय शंकर बॅक्वेट हॉलमध्ये होणाऱ्या या मेळाव्यास काँग्रेसचे विधिमंडळ नेते आ. बाळासाहेब थोरात, प्रदेश कार्याध्यक्षा तथा उत्तर महाराष्ट्र प्रभारी आ. प्रणिती शिंदे, आ. कुणाल पाटील, आ. के.सी. पाडवी, महिला काँग्रेस अध्यक्षा संध्या सव्वालाखे व जिल्ह्याचे प्रभारी डॉ. राजू वाघमारे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. मेळाव्याच्या पूर्वतयारीसाठी जिल्हा निरीक्षक दीप चव्हाण व जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे यांच्या उपस्थितीत काँग्रेसच्या शहर-जिल्हा पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक गुरूवारी (दि.५) काँग्रेस कमिटीत पार पडली. (Nashik News)

संबधित बातम्या :

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटनात्मक बळकटीसाठी तसेच स्थानिक पातळीवर निवडणुकांची व्यूव्हरचना आखण्यासाठी हैद्राबाद येथे झालेल्या पक्षाच्या कार्यकारिणी बैठकीतील निर्देशानुसार या मेळाव्याचे आयोजन केले आहे. निरीक्षक दीप चव्हाण यांनी या मेळाव्याच्या पूर्वतयारीचा आढावा घेतला. मेळाव्यात उदयपूर (राजस्थान) शिबिरातील निर्णयाची अमंलबजावणी, मंडल कमिटया, बुथ प्रमुख, ग्रामसमिती, तालुका कार्यकारिणी, जिल्ह्यातील संघटनात्मक रिक्त पदे, आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीबाबत, सार्वजनिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रम तसेच जिल्हा व तालुका कॉंंग्रेस कमिटीच्या ठराव बुकाच्या तपासणीबाबत या मेळाव्यात चर्चा होणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.

मेळाव्यात नाशिक शहरातील पदाधिकाऱ्यांशी सकाळी १० वाजता, नाशिक ग्रामीण १०:४५ वाजता, अहमदनगर शहर ११:३० वाजता व ग्रामीण दुपारी १२: १५ वाजता, नंदुरबार दुपारी २ वाजता, जळगाव शहर दुपारी २:४५ वाजता. जळगाव ग्रामीण दुपारी ३:३० वाजता, धुळे शहर दुपारी ४:१५ वाजता, धुळे ग्रामीण सायं ५:०० वाजता तर मालेगाव शहर सायं ५:४५ वाजता चर्चा होणार असल्याचेही चव्हाण म्हणाले. यावेळी जिल्हाध्यक्ष तुषार चव्हाण, शहराध्यक्ष अॅड आकाश छाजेड, प्रदेश सचिव रमेश कहांडोळे, भास्कर गुंजाळ यांनीही मनोगत व्यक्त केले. तसेच तालुकाध्यक्ष विनायक सांगळे, अॅड समिर देशमुख, प्रशांत बाविस्कर, प्रकाश पिंपळ, दिनकर निकम, डॉ राजेंद्र ठाकरे, विजय जाधव, सखाराम भोये, हरेश्वर सुर्वे, केदा सोनवणे, कार्याध्यक्ष अरुण गायकर, प्रदेश प्रतिनिधी यशवंत अहिरे, दिलीप शिंदे, धर्मराज जोपळे, अंबादास दिघे, राजकुमार जेफ, अमोल मरसाळे, दिलीप पाटील, अंबादास ढिकले आदींसह पदाधिकारी उपस्थित होते. जिल्हा कॉंंग्रेस अनुसूचित जाती विभाग अध्यक्ष ज्ञानेश्वर काळे यांनी प्रास्ताविक केले.

हेही वाचा :

Back to top button