जळगाव जिल्ह्यात लैंगिक अत्याचाराच्या दोन घटना

जळगाव जिल्ह्यात लैंगिक अत्याचाराच्या दोन घटना
Published on: 
Updated on: 

जळगाव : पुढारी वृत्तसेवा, जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात एका अल्पवयीन मुलीवर व दुसऱ्या घटनेत 19 वर्षीय युवतीवर लैंगिक अत्याचाराच्या घटना उघडकीस आल्या आहेत. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जामनेर तालुक्यातील महाविद्यालयात शिकणाऱ्या युवतीला धमकी देत लिव्ह अँड रिलेशनशिपची नोटरी करून घेत मयूर देवेंद्र गोढरी याने वेळोवेळी बळजबरीने शारीरिक संबंध ठेवले. या प्रकरणी युवतीने दिलेल्या फिर्यादीवरून गोढरीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

संबधित बातम्या :

तर दुसरी घटना ही जामनेर तालुक्यातील असून, शेतात राहणाऱ्या मध्य प्रदेशातील कुटुंबातील १५ वर्षीय मुलीवर युवकाने अत्याचार केल्यानंतर पळून जाताना मुलीने केलेल्या आरडाओरड्याने हा प्रकार उघडकीस आला. मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून अजय काशीराम सोळंकीविरुद्ध पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक संजय बनसोडे हे तपास करत आहेत.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news