नाशिक तहसीलदारपदी डॉ. शोभा पुजारी | पुढारी

नाशिक तहसीलदारपदी डॉ. शोभा पुजारी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा,  नाशिकच्या तहसीलदारपदी डॉ. शोभा पुजारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुजारी यांनी बुधवारी (दि. ४) प्रभारी तहसीलदार रचना पवार यांच्याकडून पदभार स्वीकारला. त्यामुळे दोन महिन्यांपासून प्रभारी असलेल्या नाशिक तहसीलला पूर्णवेळ अधिकारी लाभला आहे.

संबधित बातम्या :

नाशिकचे तत्कालीन तहसीलदार अनिल दौंडे यांची शासनाने १६ एप्रिल रोजी बदली केली. त्यांच्या जागी नाशिकरोड विभागीय आयुक्तालयातील तहसीलदार नरेशकुमार बहिरम यांची नेमणूक शासनाने केली. परंतु, बहिरम यांना दोन महिन्यांपूर्वी पंधरा लाख रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधात्मक विभागाने ताब्यात घेतले. शासनाने बहिरम यांना निलंबित करताना तहसीलचा अतिरिक्त कार्यभार जिल्हाधिकारी कार्यालयातील संजय गांधी योजनेच्या तहसीलदार रचना पवार यांच्याकडे सोपविण्यात आला होता.

मागील दोन महिन्यांपासून प्रभारी अधिकाऱ्याच्या खांद्यावर नाशिक तहसीलची जबाबदारी असल्यामुळे कार्यालयातील कामकाज काहीसे थंडावले होते. या पदावर पूर्णवेळ अधिकाऱ्याची नेमणूक करावी, अशी मागणी होत होती. अखेर शासनाने डॉ. शोभा पुजारी यांच्याकडे नाशिक तहसीलची जबाबदारी सोपविली आहे. शासनाने पुजारी यांची दोन महिन्यांपूर्वी सोलापूर जिल्ह्यातील माेहोळला तहसीलदार म्हणून बदली केली होती. परंतु, तेथील स्थानिक राजकारणापायी त्यांनी पदभार स्वीकारला नव्हता. पुजारी यांची पूर्णवेळ तहसीलदारपदी नेमणूक झाल्याने रखडलेली कामे तत्काळ मार्गी लागतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहेत.

हेही वाचा :

Back to top button