जालना : बागेतील खेळणीचे साहित्य घेऊन जाणाऱ्या ट्रकचा अपघात; एक ठार | पुढारी

जालना : बागेतील खेळणीचे साहित्य घेऊन जाणाऱ्या ट्रकचा अपघात; एक ठार

आष्टी; पुढारी वृत्तसेवा : आष्टी कुंभार पिंपळगाव रस्त्यावर दोन वाहनांच्या धडकेत एक जण ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. बुधवारी (दि 4) सकाळी हा अपघात झाला.

आष्टी अंबड रस्त्यावर एक ट्रक बागेतील खेळणीचे साहित्य घेऊन आष्टीकडे येत होता. यावेळी समोर येत असलेल्या दुसऱ्या ट्रकची आणि खेळणी नेणाऱ्या ट्रकची समोरासमोर धडक झाली. यामध्ये ट्रक चालक सखाराम आश्रोबा दंडवते (वय 35 रा. पांगरी ता. जिंतूर) हे जागीच ठार झाले. तर दुसऱ्या ट्रकचा चालक गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे.

या चालाकाचे नाव अद्यापसमजले  नाही. या अपघाताची माहिती आष्टी पोलीसांना कळताच तात्काळ सहाय्यक फौजदार गोपीनाथ कांदे, पोलीस कॉन्स्टेबल सज्जन काकडे, विनोद वाघमारे हे घटनास्थळी दाखल झाले. धडक ईतक्या जोराची होती की पोलीसांना दुसऱ्या ट्रक व ट्रॅक्टर च्या सहाय्याने दोन्ही वाहने बाजूला करुन जखमींना बाहेर काढून प्राथमिक आरोग्य केंद्र आष्टी येथे दाखल केले मात्र त्यात सखाराम दंडवते याचे निधन झाले असून आयसर चालकाला जालना येथे हलविण्यात आले आहे वैद्यकीय अधिकारी डॉ मोरे यांनी दिलेल्या माहितीवरून आष्टी पोलीस ठाण्यात नोंद घेण्यात आली आहे

Back to top button