Pune Rain news : भोरच्या पश्चिम भागात मुसळधार पाऊस | पुढारी

Pune Rain news : भोरच्या पश्चिम भागात मुसळधार पाऊस

भोर : पुढारी वृत्तसेवा :  भोर शहर पश्चिम भागात दुपारच्या वेळी मुसळधार पाऊस पडल्यामुळे आठवडे बाजारात ग्राहक तसेच व्यापार्‍यांची मोठी धांदल उडाली. यामुळे भाजीपाल्यांचे मोठे नुकसान झाले असून, त्यांना आर्थिक तोटा सहन करावा लागला आहे. असे असले तरी परतीचा पाऊस भातपिकाला फायदेशीर ठरला आहे. तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने चांगलीच ओढ दिल्यामुळे भातपिके, कडधान्य करपून जाण्याच्या मार्गांवर असताना मंगळवारी (दि. 26) दुपारच्या सुमारास शहरासह तालुक्याच्या पश्चिम भागात मुसळधार पाऊस पडला.

यामुळे तालुक्याच्या आठवडे बाजारात शेतकरी, व्यापारी आणि ग्राहकांची मोठी धांदल उडाली. या मुसळधार पावसामुळे पाण्याच्या प्रवाहात भाजीपाला वाहून गेल्यामुळे अतोनात नुकसान झाले. हा पाऊस खरिपातील कडधान्य, भातपिकांना फायद्याचा ठरला. या मुसळधार पावसामुळे भातपिकावरील तांबेरा कमी होणार असल्याचे शेतकर्‍यांनी सांगितले.

 

Back to top button