Nashik CIDCO News : झोपलेल्या प्रशासनाला जाग यावी म्हणून नागरिकांचे रात्री आंदोलन | पुढारी

Nashik CIDCO News : झोपलेल्या प्रशासनाला जाग यावी म्हणून नागरिकांचे रात्री आंदोलन

नाशिक, सिडको पुढारी वृत्तसेवा

गेल्या वीस वर्षांपासून महापालिकेच्या अधिकाऱ्यांना वारंवार तक्रारी करून, विनंती करून, निवेदन देऊनही समस्या सुटत नाही. सिडकोतील उपेंद्रनगर नजीक असलेल्या साईग्राम परिसरातील रहिवाशांची महत्त्वाची समस्या ही ड्रेनेज मिश्रित पाणी नागरिकांच्या घरात शिरत आहे. ही मोठी डोकेदुखी झाली आहे. नागरिकांच्या घरात संपूर्ण ड्रेनेचे पाणी दररोजच साचत आहे. याबाबत तक्रारी करून देखील मनपा अधिकारी दखल घेत नसल्याने सोमवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास झोपी गेलेल्या मनपा प्रशासनाला जाग यावी व ड्रेनेज मिश्रित पाणी घरात घुसण्याचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत साईग्राम परिसरातील 100 हून अधिक महिला व नागरिकांनी मनपाच्या सिडको विभागीय कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावरच ठिय्या आंदोलन केले. जोपर्यंत समस्या सुटत नाही तोपर्यंत येथून न हटण्याचा निर्णय रहिवाशांनी घेतला. (Nashik CIDCO News)

संबधित बातम्या :

सिडकोतील उपेंद्र नगर भागात असलेल्या साईग्राम सोसायटी व परिसरातील भाग हा महापालिकेकडे असताना देखील मनपाने या भागाकडे संपूर्ण दुर्लक्ष केले आहे. सुमारे 400 हून अधिक कुटुंब या ठिकाणी वास्तव्यास आहे. येथील नागरिकांच्या रस्ते, लाईट, ड्रेनेज आदी समस्या येथील नागरिकांची कायमची डोकेदुखी झाली आहे. यातच गेल्या काही दिवसांपासून ड्रेनेज मिश्रीत पाणी हे थेट नागरिकांच्या शौचालयासह संपूर्ण घरात शिरत आहे. यामुळे घरात संपूर्ण दुर्गंधी पसरून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. ड्रेनेज मिश्रीत पाणी संपूर्ण घरात शिरत असल्याने रहिवाशांना घरात बसणे देखील मुश्किल होत आहे.

सोमवारी सकाळी साईग्राम परिसरातील रहिवाशांनी मनपाच्या अधिकाऱ्यांना ड्रेनेज समस्या बाबत तक्रार केली. मात्र अधिकाऱ्यांनी याबाबत कुठलीही दखल न घेता उडवा उडवीची उत्तरे दिली असा आरोप रहिवाशांनी केला. दरम्यान झोपी गेलेल्या मनपा अधिकाऱ्यांना जाग यावी व त्यांनी समस्या सोडवाव्यात यासाठी सोमवारी (दि. 25) रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास परिसरातील स्थानिक नागरिक अॅड. मनोज आहेर यांच्या नेतृत्वाखाली मनपाच्या सिडको विभागीय कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरच ठिय्या आंदोलन केले.

याप्रसंगी अॅड. मनोज आहेर यांच्यासह दिलीप महाले, ऋषिकेश भदाणे, जयेश आहेर, अंकुश पाटील, निखिल विसपुते, बाबासाहेब कोतवाल, संजय चौधरी, शामकांत मेटकर, गिरीश महाजन, पंढरीनाथ अहिरे, दर्शन अहिरे, महावीर सिंग, मंदाकिनी पाटोळे, सविता कानडे, मीनाक्षी चौधरी, सुवर्णा महाजन, कविता आहेर, संगीता दोंदे, अर्चना महाले, मीना मेटकर, शैला गुंजाळ, वैशाली दहीकर, सुनिता भदाणे, उषा मराठे, संगीता अहिरे, गंगा भालेराव, शोभा शिरसाट, विमल पाटील, शिरीन कोतवाल, शोभा कापसे आदींसह 100 हून अधिक महिला व नागरिक सहभागी झाले होते.

हेही वाचा :

Back to top button