C-295 Aircraft : हवाई दलात ‘नवा योद्धा’ | पुढारी

C-295 Aircraft : हवाई दलात ‘नवा योद्धा’

गाझियाबाद, वृत्तसंस्था : भारतीय हवाई दलाला आज ‘नवा योद्धा’ मिळाला आहे. भारतीय वायू दलात सी-295 एअरक्राफ्ट सामील झाला आहे. चीन आणि पाकिस्तानसारख्या शत्रूंना धडकी भरवण्यासाठी सी-295 वाहतूक विमान अधिकृतपणे भारतीय वायू दलात दाखल झाले आहे. आज भारत ड्रोन शक्ती 2023 कार्यक्रमात देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडला. सी-295 मुळे भारतीय वायू दलाची ताकद आणखी वाढली असल्याचे राजनाथ यांनी यावेळी सांगितले.

भारतीय वायू दलाचा ‘नवा योद्धा’

भारतीय वायू दलात 50 हून सी-295 विमाने सामील होणार आहेत. आज सी-295 एअरक्राफ्ट भारतीय वायू दलाची ताकद वाढवण्यासाठी अधिकृतरीत्या भाग बनला आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी गाझियाबाद येथील हिंजन एअरबेसवर एका कार्यक्रमात हे विमान अधिकृतरीत्या वायू दलाकडे सोपवले आहे. 2026 पर्यंत एकूण 56 सी-295 विमाने वायू दलात दाखल होतील. यांचा खर्च सुमारे 21,935 कोटी रुपये आहे.

Back to top button