लष्कराच्या जवानावर हल्ला; पाठीवर लिहिले ‘पीएफआय’ | पुढारी

लष्कराच्या जवानावर हल्ला; पाठीवर लिहिले ‘पीएफआय’

तिरुअनंतपूरम, पीटीआय : केरळच्या कोल्लम जिल्ह्यात रविवारी (दि. 24) शाईन कुमार नावाच्या भारतीय लष्करी जवानावर काही अज्ञातांनी हल्ला केला. आरोपींनी त्यांचे हात बांधून त्यांच्या पाठीवर ‘पीएफआय’ (पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया) असे लिहिले आहे. या धक्कादायक प्रकारानंतर गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींचा शोध पोलिसांनी तातडीने सुरू केलाआहे.

शाईन कुमार कोल्लम जिल्ह्यातील कडक्कल येथील रहिवासी आहेत. त्यांच्या घराशेजारी रबराचे जंगल असून, या जंगलात सहाजणांच्या टोळक्याने त्यांच्यावर हल्ला केला. अर्थातच, ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ ही इस्लामिक संघटना असून, काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने या संघटनेवर बंदी घातली आहे. दरम्यान, शाईन कुमार हे राजस्थानमध्ये लष्कराच्या तांत्रिक विभागात कार्यरत आहेत. हल्ल्यानंतर आरोपी तेथून पळून गेले.

Back to top button